सौ.हनिशा प्रवीण दुधे चंद्रपूर जिल्हा प्रतिनीधी मो.9764268694.
बल्लारपूर वस्ती विभागात पाच झाडे लावून वृक्षारोपण करण्यात आले. अध्यक्षस्थानी तहसीलदार अभय गायकवाड होते. प्रमुख पाहुणे म्हणून बल्लारपूर नगर परिषद मुख्याधिकारी विशाल वाघ, वैद्यकीय अधिकारी डॉ. गजानन मेश्राम, बल्लारपूरचे पोलीस निरीक्षक श्याम गव्हाणे, पत्रकार वसंत खेडेकर उपस्थित होते.
या वेळी जिल्हासह बल्लारपूर शहराचा नावलौकिक मिळविणाऱ्या कौन बनेगा करोडपती मध्ये सहभागी झालेली जमजम पठाण, दोन सुवर्णपदक विजेता आरुष चव्हाण तसेच सामान्य परिवारात राहून समाज सेवा करणारे जाकिर भाई यांचा पाहुण्यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.पर्यावरण संवर्धन व संरक्षण समितीचे अध्यक्ष काशिनाथ सिंग,उपाध्यक्ष हनुमानसिंग खेंगर, हिरालाल सोनी, सचिव परविंदर अरोरा, कोषाध्यक्ष गोपाल अरोरा, सदस्य नरेंद्र तिलोकणी, किशोर तिलोकाणी, राजू मुद्रा, करण सलुजा, यशपाल सिंह,आबिद शेख, कुलबिर, बलवीर अरोरा यांनी यशस्वितेसाठी प्रयत्न केले. कार्यक्रमाचे संचालन विक्की दुपारे यांनी केले

