अकोला जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन अकोला:- सामाजिक कार्यकर्ते उमेश इंगळे यांनी महानगरपालिका आयुक्त डॉ सुनिल लहाने यांना जन्म-मृत्यू प्रमाणपत्र झोन निहाय देण्यासाठी तसेच महानगरपालिकेने अनेक वर्षापासून मालमत्ता करामध्ये भरमसाठ वाढ केल्यामुळे तसेच स्वाती इंडस्ट्रीच्या नाकर्तेपणामुळे महानगरपालिकेला मालमत्ता कर वसुलीचे उद्दिष्ट गाठता आले नाही. शहरातील नागरिकांना मालमत्ता कर भरण्यास दिलासा मिळावा व महानगरपालिकेच्या उत्पन्नामध्ये वाढ होण्यासाठी महानगर पालिकेच्या प्रशासनाने मालमत्ता करावरील शास्ती माफ करावी. यासाठी निवेदनाद्वारे मागणी केली होती.
त्या मागणिची दखल घेत जन्म- मृत्यू प्रमाणपत्र झोन निहाय केले. तसेच शास्ती माफ करण्याचा निर्णय घेतला. त्या निर्णयामुळे शहरातील नागरिकांना खुप मोठा दिलासा मिळाला. व सामाजिक कार्यकर्ते उमेश इंगळे यांच्या निवेदनाची दखल घेतली म्हणून महानगरपालिका आयुक्त डॉ. सुनिल लहाने यांचा महानगरपालिका येथे आयुक्त यांच्या कार्यालयात सत्कार करण्यात आला.
यावेळी एम. एम. तायडे, समिर खान, महेंद्र भोजने, हिम्मतराव सदाशिव, सतिश तेलगोटे, यशवंतराव इंगोले, उत्तमराव सदाशिव, संतोष डोगंरदिवे, उल्हास सरदार इत्यादी उपस्थित होते.

