Tuesday, April 14, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home गडचिरोली

गडचिरोली पोलीसांनी केला चारचाकी वाहन व अवैध दारुसह एकुण 03, 42, 500/- रुपयांचा मुद्देमाल जप्त.

मधू गोंगाले by मधू गोंगाले
January 21, 2025
in गडचिरोली
0 0
0
गडचिरोली पोलीसांनी केला चारचाकी वाहन व अवैध दारुसह एकुण 03, 42, 500/- रुपयांचा मुद्देमाल जप्त.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मो. नं. 9420751809.

गडचिरोली जिल्हयात दारुबंदी असतांना अवैधरित्या छुप्या रीतीने दारु विक्री व वाहतुक केली जाते. त्याविरुध्द पोलीस अधीक्षक श्री. नीलोत्पल यांचे अवैध दारु विक्री करणा­यांवर अंकुश लावण्याबाबत मिळालेल्या आदेशान्वये काल दिनांक 20 जानेवारी 2025 रोजी एका चारचाकी सिल्वर करलची फोर्ड कंपनीची फिएस्टा वाहनाने काही इसम आरमोरी दिशेकडून वडसा मार्गे अवैध दारुची वाहतुक करणार आहे, अशी गोपनिय माहिती पोअं/शैलेश तोरकपवार, पोस्टे वडसा यांना मिळाली. सदरची माहिती वडसा येथील पो.नि. अजय जगताप यांना याबाबत कळविले असता, पो.नि. अजय जगताप यांच्या नेतृत्वात पोस्टे वडसा येथील पोलीस पथकाने सदर वाहनाचा पाठलाग केला. पाठलाग करत असतांना शंकरपूर येथून वाहन चालक हा पोलीसांना चकमा देवून कुरखेडाच्या दिशेने वेगाने पळून गेला. त्यानंतर सदर बाबत पो.नि. जगताप यांनी पोस्टे कुरखेडा येथील पो.नि.महेंद्र वाघ यांना माहिती दिली.
सदर माहितीवरुन पोस्टे कुरखेडा येथील पो.नि. महेंद्र वाघ यांनी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकासह गोठणगावाजवळ सापळा रचून बसले असता, रात्री 22.00 वा दरम्यान एक चारचाकी फोर्ड कंपनीची फिएस्टा वाहन हे भरधाव वेगाने येताना दिसली. त्यावेळी पोलीसांनी वाहन चालकाला हात दाखवून त्यास वाहन थांबविण्याचे प्रयत्न केले असता, वाहन चालक पोलीसांना हुलगावणी देवून भरधाव वेगाने पळून गेला. त्यानंतर सदर वाहनाचा पाठलाग करुन मौजा कढोली येथील तूकाराम विदयालयासमोर वाहनाला थांबविण्यात आले. त्यावेळी वाहन रस्त्यावर उभी करुन वाहन चालक अंधाराचा फायदा घेत जंगलाच्या दिशेने पळून गेला होता. त्यानंतर सदर वाहन चालकाचा शोध घेतला असता तो मिळून आला नाही.
सदर वाहनाच्या तपासणी दरम्यान त्यात खाखी रंगाच्या खडर्यामध्ये एकुण 25 पेटी ज्यामध्ये प्रत्येकी देशी दारू टायगर ब्रॉन्ड संत्रा कंपनीचे 90 एम.एल. मापाच्या 95 नग निपा असे एकुण 2375 नग निपा किंमत अंदाजे 1,42,500/- रु. मिळून आल्याने सदर अवैध दारु सहित एक चारचाकी फोर्ड कंपनीची फिएस्टा वाहन क्र. एम. एच. 31 सी. एन. 7120 किंमत अंदाजे 2,00,000/- रु. असा एकुण 3,42,500/- रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. संबंधीत घटनेच्या अनुषंगाने पोस्टे कुरखेडा येथे अप.क्र. 12/2025 कलम 65 (अ) महा. दा. का. सहकलम 184 मो.वा.का. अन्वये अज्ञान इसमा विरुध्द गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास सुरु आहे.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक श्री. नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) श्री. यतिश देशमुख, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) श्री. एम. रमेश, अपर पोलीस अधीक्षक अहेरी डॉ. श्रेणिक लोढा तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी गडचिरोली श्री. सुरज जगताप व उपविभागीय पोलीस अधिकारी कुरखेडा श्री. रवींद्र भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोस्टे कुरखेडा पो. नि. श्री. महेंद्र वाघ, पोउपनि. दयानंद भोंबे, पोहवा/शेखलाल मडावी, पोअं/संदेश भैसारे, पोअं/नरसिंग कोरे, चासफौ/घागी, तसेच पोस्टे वडसा येथील पो.नि.श्री. अजय जगताप, सपोनि. मनीष गोडबोले, पोउपनि. चेतन परदेशी, पोहवा/राकेश डोनाडकर, पोअं/शैलेश तोरकपवार, पोअं/नितेश यांनी पार पाडली.

Previous Post

बल्लारपूर शहरात पर्यावरण संवर्धन व संरक्षण समितीतर्फे वरुक्षारोपण.

Next Post

नागपूर अल्पवयीन मुलाने आईच्या मदतीने केली वडिलाची गळा आवळून हत्या, मृतदेह पोत्यात घालून नदीत फेकण्याची तयारी.

मधू गोंगाले

मधू गोंगाले

महाराष्ट्र संदेश न्युज सह संपादक असून ते गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासी आणि नक्षलग्रस्त भागातील अहेरी तालुक्यातील आहे.

Next Post
नागपूर अल्पवयीन मुलाने आईच्या मदतीने केली वडिलाची गळा आवळून हत्या, मृतदेह पोत्यात घालून नदीत फेकण्याची तयारी.

नागपूर अल्पवयीन मुलाने आईच्या मदतीने केली वडिलाची गळा आवळून हत्या, मृतदेह पोत्यात घालून नदीत फेकण्याची तयारी.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In