आरे कारे ची भाषा करणाऱ्या मुजोर महिला कर्मचारीची बदली करून ग्राहकाला होणारा त्रास थांबवा नागरिकांची मागणी.
रविंद्र भदर्गे, जालना जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन परतूर:- तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा जवळील कॅनरा बँक मध्ये मॅनेजर यांच्या दुर्लक्ष मुळे महिला कर्मचाऱ्यांचा मनमानी कारभार वाढला असून ग्राहकाला होणारा त्रास थांबणार कधी यावर समस्त तालुक्यातील नागरिक करत आहेत.
प्राप्त माहितीनुसार, दिनांक 20 जानेवारी रोजी काही डॉक्युमेंट व्हेरिफाय करण्यासाठी खातेदार बैंक मध्ये गेला असताना महिला कर्मचारी पत्रकाराला अरेरावेची भाषा वापरण्यात आली. त्यामुळे आश्चर्याची गोष्ट अशी आहे की सामान्य नागरिकासोबत यांचा व्यवहार कसा असेल, असा प्रश्न सामान्य नागरिकांतून समोर येत आहे तसेच कॅनरा बँक मध्ये मनमानी दादागिरी करणाऱ्या कर्मचारी महिला यांना ग्राहकाला बोलण्याची ट्रेनिंग दिली का नाही असा प्रश्न समोर येत आहे.
बँकेतील अशा मुजोर महिला कर्मचारी यांची बदली करून सामान्य नागरिक व ग्राहकाला होणारा त्रास थांबवा. आणि नवीन कर्मचारी त्यांच्या जागी देण्यात यावी अशी मागणी परतूर पत्रकार संघाचे उपाध्यक्ष गणेश लालझरे यांनी केली आहे.

