प्रविण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- हिंगणघाट कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती व सहकार नेते हिंगणघाट नगर पालिकेचे माजी नगराध्यक्ष सुधीर कोठारी यांनी आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह शिर्डीत आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अधिवेशनात उपमुख्यमंत्री अजित पवार, ज्येष्ठ नेते माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल, आरसीए प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, माजी केंद्रीय मंत्री सुबोध मोहिते आदींच्या उपस्थितीत सुधीर कोठारी, कामगार नेते अबताब खान, नरेंद्र थोरात यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रफुल्ल पटेल, खासदार तटकरे यांनी सर्वांचे स्वागत केले.
ॲड कोठारी व अन्य नेत्यांच्या प्रवेशामुळे या पक्षाला वर्धा जिल्ह्यात बळ मिळेल आणि महायुतीलाही अधिक फायदा होईल, असा विश्वास पक्षाच्या नेत्यांनी व्यक्त केला. या प्रवेशावर ॲड. सुधीर कोठारी यांनी आम्ही मूळ पक्षात आहोत, या पक्षात सुरुवातीपासूनच काम करत आहोत, यापुढील काळातही या पक्षाला अधिक मजबूत करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे मत व्यक्त केले.

