माता रमाई आवास व पी एम आवास योजनेतील लाभार्थी यांना लुटणाऱ्या भ्रष्ट इंजिनियर यांना मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी चौकशी करून निलंबित करा: वंचित बहुजन आघाडी परतूर
सातोना सर्कल इंजिनियर अंकुश लहाने यांच्या कॉलची सीडीआर मार्फत चौकशी करून कार्यवाही करण्यात यावी.
रविंद्र भदर्गे, जालना जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन जालना:- परतूर पंचायत समिती अंतर्गत चालू असलेल्या pm आवास योजना व माता रमाई आवास योजनेतील घरकुल लाभार्थी यांना शासनाने ठरवून दिलेला निधी 1,20,000 हजार इतकी आहे आणि जे पंचायत समितीचे घरकुल विभागाचे इंजिनियर परतूर तालुक्यातील प्रत्येक गावातील लाभार्थी यांच्या कडून घरकुल चे बील टाकण्यासाठी एका घरकुल लाभार्थ्याकडून एका बिलाचे 4000 हजार रुपयें तर असे एकूण तीन बिलाचे 10000 हजार रुपये घेतात त्यामुळे लाभार्थी यांनी घर बांधावे कि फक्त इंजिनियर व कर्मचारी यांचे घर भरावे असा प्रश्न निर्माण झाला आहे.
कारण घर बांधण्यासाठी मिस्त्री चे 70 ते 80 हजार रुपयें मजुरी होते 40 हजारामध्ये लाभार्थिंनी विटा वाळू सिमेंट कसे आणावे आणि त्यातली त्यात इंजिनियर घेतात 8 ते 10 दहा हजार रु तर लाभार्थी यांना असा प्रश्न परतूर तालुक्यात निर्माण होत आहे. याबाबत वंचित बहुजन आघाडीच्या वतीने गटविकास अधिकारी परतूर यांच्याशी चर्चा केली असता त्यांनी समाधानकारक उत्तर न देता तुम्ही मुख्य कार्यकारी अधिकारी जालना यांच्याकडे तक्रार करा असे सांगितले.
त्यामुळे वंचित बहुजन आघाडी परतूर तालुक्याच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी यांना विनंती आहे कि सातोना सर्कल मधील वरफळ येथील लाभार्थीकडून इंजिनियर अंकुश लहाने यांनी प्रत्येक लाभार्थी यांच्याकडून दलाल हाताशी धरून 45000 हजार रुपये चे बील टाकण्यासाठी 4000 हजार रुपये प्रती लाभार्थी कॅश घेतात व बील टाकतात असा प्रकारे लाभार्थी यांना लुटणाऱ्या भ्रष्ट इंजिनियर अंकुश लहाने यांच्या मोबाईल फोन सीडीआर काढून चौकशी करून निलंबित करण्यात यावे नसता वंचित बहुजन आघाडी परतूर तालुक्याच्या वतीने आपल्या कार्यालयापुढे तीव्र आंदोलन करण्यात येईल. असा इशारा वंचित बहुजन आघाडी परतुर तालुका अध्यक्ष यांनी दिला.

