प्रविण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- तालुक्यातील वेळा येथील संजीवनी कॉन्व्हेन्ट येथे २० वे वार्षिक उत्सव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाला राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले, शिक्षण विस्तार अधिकारी सुभाष टकले हे प्रामुख्याने उपस्थित होते.
या कार्यक्रमाची सुरुवात दिप प्रज्वलन करून करण्यात आली. यावेळी शाळेतील उत्कृष्ट विद्यार्थ्यांचे सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन स्वागत करण्यात आले. तसेच यावेळी उपस्थिताना मार्गदर्शन केले.
याप्रसंगी जिल्हा सरचिटणीस दशरथ ठाकरे,माजी सरपंच सुनंदाताई सायंकार, डॉ.स्नेहल चौधरी, समाजसेवक विलास शेंडे,व्यवस्थापक समितीचे अध्यक्ष अरविंदजी सांगोळे, मुख्याध्यापिका शिलाजी बोरकर, सुभाष कडू, हर्षल बोरकर, डॉ.कोमल चौधरी, रुबीना खान, ठाकरे मॅडम, नितीन धारायने, प्रफुल धोटे यांच्यासह सर्व विद्यार्थी, पालक वर्ग, ग्रामस्थ उपस्थित होते.

