उषाताई कांबळे सांगली जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सांगली:- जिल्हातून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. येथे एकमेकांकडे रागाने बघितल्याच्या शुल्लक कारणावरून 3 आरोपींनी मिळून एका युवकाचा धारदार शस्त्राने सपासप वार करून त्याची हत्या केली आहे. गौरव हेमंत कुलकर्णी वय 20 वर्ष, रा. गणेश भाजी मंडई इस्लामपूर असे हत्या करण्यात आलेल्या युवकाचे नाव आहे. ही घटना सोमवार (दि.27 जानेवारी) रात्री 10.30 वाजताच्या सुमारास यल्लमा चौकात घडली.
या हत्या प्रकरणी अट्टल गुन्हेगार व यापूर्वी हत्येचा गुन्ह्यातील आरोपी असलेल्या सौरभ सुशील पाटील (रा. इस्लामपूर), जहांगीर मुजावर (रा. गोटखिंडी, ता. वाळवा) या दोघांसह आणखी एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. इस्लामपूर पोलिसांनी काल रात्रीचा सुमारास या दोघांना बेड्या ठोकल्या असून तिसरा हल्लेखोर फरार आहे.
प्राप्त माहितीनुसार, मृतक गौरव कुलकर्णी याने सौरभ पाटील याच्याकडे शुल्लक कारणावरून झालेल्या वादात रागाने बघितले यातून रागाच्या भरात आरोपी सौरभ याने त्याच्या दोन सहकाऱ्यांना घेऊन गौरव कुलकर्णी याचा चाकूने सपासप वार करून त्याची हत्या केली.
मृतक गौरव हा फोटोग्राफर होता. तर, संशयित सौरभ याची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक संजय हारुगडे यांनी आपली यंत्रणा तात्काळ सक्रिय करत या दोघांनाही ताब्यात घेतले आहे. सौरभ पाटील हा गुन्हेगारी पार्श्वभूमीचा असून त्याच्यावर यापूर्वी हत्येचे अन्य दोन गुन्हे दाखल आहेत. सध्या तो जामिनावर बाहेर होता. दरम्यान, त्याने हा आणखी एक हत्या केली आहे.

