✒️राजेंद्र झाडे, चंद्रपूर उपजिल्हा प्रतीनीधी
मो नं 9518368177
गोंडपीपरी:- सातबाऱ्यावर नावाची नोंद करण्यासाठी तलाठी व कोतवाल यांनी 4 हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली, मात्र लाच मागण्याचा त्यांचा प्रयत्न फसला व दोघेही लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकले.
फिर्यादी हा शेतीचे काम करतो, त्यांच्या आजीच्या नावाने कोंढाणा येथे शेतजमीन होती. फिर्यादी यांची आजी 2 मे 2021 ला मरण पावली, त्या शेतीच्या सातबाऱ्यावर आजीचे नाव कमी करीत स्वतः व नातेवाईकांचे नाव चढवायचे असल्याने याबाबत धाबा येथील तलाठी ओंकार संजय भदाडे सम्पर्क साधला असता तलाठी भदाडे यांनी फिर्यादी यांना काम करण्याकरिता 4 हजार रुपये मागितले. पैसे देण्याची इच्छा नसल्याने फिर्यादी यांनी लाचलुचपत विभागाच्या ऑनलाइन complent@acbmaharashtra.net वर तक्रार नोंदविली.
लाचलुचपत विभागाने तक्रारीची पडताळणी करीत सापळा रचला, पण लाचेची रक्कम तलाठी भदाडे यांनी तडजोडीअंती 2 हजार रुपये तलाठी कार्यालय धाबा येथील कोतवाल चंद्रकांत नेमचंद मुंजेकर यांच्या हाताने लाचेची रक्कम स्वीकारली असता लाचलुचपत विभागाने कोतवाल मुंजेकर यांना रंगेहात अटक केली.
सदरची यशस्वी कारवाई पोलीस उपअधीक्षक अविनाश भामरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक जितेंद्र गुरनुले, पोलीस कर्मचारी नरेश ननावरे, संदेश वाघमारे, राकेश जांभुळकर, काचोळे, सतीश सिडाम यांनी पार पाडली.

