पल्लवी मेश्राम उपसंपादक नागपूर
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर:- पोलीस दलातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. नागपूर शहरातील पोलीस मुख्यालयात दिनांक 29 जानेवारीला बुधवारला तैनात असलेल्या एका सहायक उपनिरीक्षक असलेल्या पोलीस अधिकाऱ्याने विष प्राशन करून आत्महत्या केली रामचंद्र नानाजी रोहनकर वय 54 वर्ष राह. हुडकेश्वर असे आत्महत्या केलेल्या पोलीस अधिकाऱ्याचे नाव असून या घटनेने पोलीस दलात एकच खळबळ माजली आहे.
प्राप्त माहितीनुसार, रामचंद्र नानाजी रोहणकर वय 54 वर्ष यांनी मंगळवारी रात्री कळमना परिसरातील ईव्हीएम स्ट्राँग रूममध्ये ड्युटीवर कर्तव्यावर होते यावेळी विष प्राशन केले, त्यानंतर त्यांना रुग्णालयात नेण्यात आले. यांचा बुधवारी सकाळी उपचारादरम्यान मृत्यू झाला. 2024 मधील एका घटनेशी संबंधित बडतर्फ च्या नोटीस मिळाल्यानंतर पोलिस कर्मचाऱ्याच्या कुटुंबीयांनी दावा केला आहे की तो निराश झाला होता.
ते म्हणाले की, मागील वर्षी शहरातील निमजे साओजी रेस्टॉरंटमध्ये सहायक उपनिरीक्षक रोहणकर आणि हेड कॉन्स्टेबल भूषण रामचंद्र यांच्यात भांडण झाले होते. दारूच्या नशेत त्याने रेस्टॉरंट मालकावर हल्ला केला आणि घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला, त्यानंतर पोलीस उपायुक्त रविंदर कुमार सिंघल यांनी त्याला निलंबित केले. त्यानंतर दोघांनाही बहाल करण्यात आले आणि ईव्हीएम स्ट्राँग रूममध्ये ड्युटीवर ठेवण्यात आले, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. मात्र, गेल्या आठवड्यात तपासाअंती दोन्ही पोलिसांना सेवेतून बडतर्फ का करू नये, अशा नोटिसा पाठवण्यात आल्या होत्या.
रोहनकर यांनी हे कठोर पावले का उचलले याबाबत नेमके कारण अद्याप अस्पष्ट असले तरी, मानसिक ताण हे कारणीभूत असल्याचा संशय आहे. याप्रकरणी पोलिसांनी अपघाती मृत्यूचा गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस करत आहे. पोलिसांच्या तपासातून काय समोर येथे हे बघावं लागेल.

