प्रवीण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- पोलीस दलातून एक खळबळजनक माहिती समोर आली आहे. आर्वी पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल करुन घेण्यास टाळाटाळ करणाऱ्या दोन पोलीस कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली. तर पोलीस स्टेशनचे ठाणेदार यांची तडकाफडकी मुख्यालय ठिकाणी बदली करण्यात आल्याच्या घटनेने खळबळ उडाली आहे.
आर्वी येथील अजय कदम यांच्या मालकीच्या जागेवर इतरांनी जबरदस्तीने ताबा घेतल्या त्यामुळे अजय कदम यांनी पोलीस स्टेशन मध्ये जाऊन तक्रार दाखल करण्याबाबत पोलिसांना विनंती केली होती. पण या प्रकरणी तक्रार दाखल करुन घेण्यास टाळाटाळ करण्यात आली होती. तक्रार दाखल करुन घेण्यास टाळाटाळ करणाऱ्या दोन पोलीस कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली. तर ठाणेदार यांना तडकाफडकी मुख्यालय ठिकाणी बदली केली आहे.
पोलिस स्टेशन मध्ये तक्रार घेवून येणाऱ्याची तक्रार घेणे हे पोलिसांचे कर्तव्य असून त्यानंतर तपास करुन गुन्हा नोंद करणे आवश्यक आहे. पण, स्टेशन डायरीवरील कर्मचारी गजानन मरस्कोल्हे व अंमलदार सतिश नंदागवळी यांनी पोलीस निर8क्षक यांच्या आदेशाशिवाय तक्रार घेतली जाणार नाही, असे अजय कदम सांगितले. त्यानंतर बराच वेळ त्यांना पोलीस स्टेशन मध्येच बसवून ठेवले होते. त्यानंतर स्थानिक लोकप्रतिनिधींनी लक्ष घातल्यानंतर पोलिसांनी तक्रार दाखल करुन घेतली होती.
पोलिस कर्मचाऱ्याने कर्तव्य बजावण्यात कसूर केल्याने हे प्रकरण थेट पोलिस महानिरीक्षक यांच्या पर्यंत गेले. त्यानंतर पोलिस महानिरीक्षक दिलीप पाटील भुजबळ, वर्धा जिल्हाचे पोलीस अधीक्षक अनुराग जैन, अतिरिक्त पोलिस अधीक्षक वर्धा डॉ. सागर कावडे आर्वीत दाखल झाले. त्यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी केल्यानंतर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांची पोलीस मुख्यालयी बदली करण्यात आली. तर मरस्कोल्हे व नंदागवळी या दोन कर्मचाऱ्यांना निलंबित केले.

