अनिल अडकिने नागपूर जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सावनेर २८ जाने:- एसटी बसच्या दरवाढीचा शिवसेना उद्धव ठाकरे पक्ष आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यामुळे राज्यात जोरदार आंदोलन करण्यात येत आहे. त्यात एसटी बसच्या तिकीट दरवाढीचा निषेध उत्तम कापसे जिल्हाध्यक्ष शिवसेना (ऊबाठा) यांच्या प्रमुख उपस्थितीत सावनेर बस स्टॅन्ड येथे करण्यात आला.
महाराष्ट्र शासनाने काही दिवसा अगोदर प्रवासी भाडे १५% नी वाढविला. त्यामुळे प्रवासी खर्चही लोकांचा वाढला. महाराष्ट्र राज्यात अगोदरच बेरोजगारीचा प्रश्न आहे आणि आता ही महागाई त्यामुळे प्रवाशाचे कंबरडे मोडणार की काय?
प्रवासी दररोज आपल्या कामानिमित्त प्रवास करित असतात वर्तून हा १५% चा भुदंडाची कात्री खिशाला बसणार आहे.
त्यामुळे १५% हे भाववाढ कमी व्हावी याकरिता शिवसेना नेते तसेच नागपूर जिल्हा अध्यक्ष उत्तम कापसे यांच्या नेतृत्वात सावनेर बस स्टैंड वर धरणा आंदोलने करून राज्य सरकार व एसटी महामंडळच्या विरोधात नारेबाजी करण्यात आली.
त्यानंतर एसटी डेपो मॅनेजर यांना आंदोलन दरम्यान लेखी निवेदन देण्यात आले. काही वेळा करिता प्रवाश्यांना जाण्या येण्याच्या त्रास झाला. त्यावर शिवसेना (ऊबाठा) नागपूर जिल्हा अध्यक्ष उत्तम कापसे यांनी प्रवाशांची क्षमा मागितली व म्हणाले हे आंदोलन सर्व प्रवाशांकरिता आहे झालेल्या त्रासाबद्दल क्षमा असावी अशाप्रकारे भावना व्यक्त केल्या.
यावेळी उपस्थितांतमध्ये जिल्हा युवासेना अध्यक्ष लोकेश बावनकर, उपाध्यक्ष प्रफुल कापसे, शिवसेना तालुका प्रमुख प्रशांत कामोने,रक्षित भौतकर, लोकेश बावनकर,रामभाऊ घाटोडे, गेंदलाल कमाले, प्रफुल नारनवरे, सुरज पाटील, जॉन अली जाफरी, रिषभ राऊत, प्रफुल बोंडे, शेखर बांबल, महेश उरकुडे, राधेश्याम गावंडे, चेतन हेलोंडे, गणेश तवले, अनिरुद्ध बोराडे, अरबाज शेख, सचिन खोटगले, आदित्य वानखडे, मंगेश गमे, सौरभ बरगट, अंकित भौतकर,अंकुश परतेती, जस्सी बलोत्रे, प्रथम पाल, रोहन इत्यादी उपस्थित होते.

