अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- हिंगणघाट तालुक्यातील अल्लीपुर पोलिसांनी ३१ जानेवारीला पहाटे ५ वाजताच्या सुमारास गुप्त माहितीच्या आधारे कानगाव कडुन गाडेगाव रोड ने एक रेती भरलेला ट्रॅक्टर कमांक MH 32 AH 7217 जात असल्याची माहिती मिळाली.
या माहितीवरून ट्रॅक्टर तपासणी केली असता, ट्रॅक्टरमध्ये 1 ब्रास वाळू आढळून आली. यावेळी पोलिसांनी चालकला अवैध वाळू वाहतूकी संबंधित परवाना विचारला असता त्याच्या जवळ कोणतेहि कागदपत्र मिळून आले नाही. त्यानंतर पोलिसांनी कारवाई करीत 7 लाख रुपये किमतीचा ट्रॅक्टर, 4 हजार रुपये किमतीची वाळू असा एकूण 7 लाख 4 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला.
हि कारवाई जिल्हा पोलीस अधिक्षक अनुराग जैन, सहाय्यक पोलीस अधिक्षक राहुल चव्हाण यांचे मार्गदर्शनात ठाणेदार प्रफुल डाहुले, रवी वर्मा यांनी केली.

