अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- येथून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. येथील वणा नदीत एका 35 वर्षीय तरुणाने उडी मारत आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. त्यामुळे संपूर्ण हिंगणघाट शहरात खळबळ उडाली आहे.
प्राप्त माहितीनुसार, हिंगणघाट शहरातील खंडोबा वार्ड येथील 35 वर्षीय युवकाचा वणा नदीच्या पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना 1 फेब्रुवारीला सायंकाळी 6.00 वाजता उघडकीस आल्याची माहिती पोलिसांकडून प्राप्त झाली. मृत्यक युवकाचे नाव श्रीकांत कुबडे असे आहे. मृत्यक श्रीकांत यास दारुचे वेसन असल्याने तो नेहमी भांडण करीत असल्याने त्याची पत्नी आरती कुबडे ही 6 महिन्यापासून आपल्या दोन मुलांसह आपल्या माहेरी घरी राहत आहे. याचा परिणाम मनावर घेऊन त्यांने वणा नदीच्या पाण्यात उडी मारून आत्महत्या केली असावी, अशी तक्रार पत्नी आरती कुबडे हिने पोलिसात दिली आहे. यावेळी पोलिसांनी गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.

