संतोष मेश्राम राजुरा तालुका प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा:- काही दिवसांनंतर 10 वीच्या वार्षिक परीक्षा होणार आहे त्यामुळे इन्फंट जिजस सोसायटी द्वारा संचालित इन्फंट जिजस इंग्लिश हायस्कूल राजुरा येथे इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांकरिता इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांकडून निरोप समारंभ आयोजित करण्यात आला होता.
या प्रसंगी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष चंद्रपूर जिल्हा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार सुभाष धोटे यांनी उपस्थित राहून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले तसेच येणाऱ्या परिक्षेत घवघवीत यश संपादन करण्यासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी संस्थेचे अध्यक्ष अभिजीत धोटे, मुख्याध्यापिका मंजुषा अलोने, मुख्याध्यापिका सिमरनकौर भंगू, मुख्याध्यापक रफिक अन्सारी यासह सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते.

