अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- भारत विद्यालय हिंगणघाट येथे वर्ग दहावीच्या विद्यार्थ्यांना माध्यमिक शालांत परीक्षेला जाता जाता काय करावे व वर्ग दहावी नंतर आईटी आणि जेईई मार्गदर्शन करण्या करता स्वर्गीय आप्पा जोशी न्यास जिल्हा वर्धा यांच्या अंतर्गत मार्गदर्शन वर्गाचे आयोजन करण्यात आले होते . या कार्यक्रमाकरिता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं वर्धा जिल्हा संघचालक जेठालांजी राजपूत तसेच मार्गदर्शक म्हणून अनिकेत कश्यप, ABCD अकॅडमीचे संचालक डॉ. रुपेशजी हिवरकर उपस्थित होते.
यावेळी अनिकेत कश्यप यानी विद्यार्थ्यांना वर्ग दहावीनंतर आयआयटी ची तयारी कशी करावी तसेच नीट परीक्षा देण्याकरता कशा प्रकारची तयारी करावी लागते त्या संदर्भात मार्गदर्शन करण्यात आले व पुढे होणाऱ्या वर्ग दहावीच्या परीक्षेकरता विद्यार्थ्यांनी आपला अभ्यास नियमितपणे कसा करावा याची रचना आणि वेळापत्रक विद्यार्थ्यांना समजून सांगण्यात आले. जिल्हा संघचालक जेठानंद राजपूत यांनी दहावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेच्या संदर्भात शुभेच्छा दिल्या. शाळेतील सर्व शिक्षक व 300 विद्यार्थी या कार्यक्रमाकरिता प्रामुख्याने हजर होते.

