अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- राज्य परिवहन हिंगणघाट आगारात राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियान महिना जानेवारी संपन्न झाला. यावेळी आयोजित कार्यक्रमात घनश्याम पाटील सहायक पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन हिंगणघाट व सुरेन्द्र आग्रे संचालक शक्ती ड्रायव्हिंग स्कूल हिंगणघाट यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि गौतम शेंडे आगार व्यवस्थापक हिंगणघाट यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला.
यावेळी सुरक्षित वाहन चालविण्यासाठी, वाहतुकीच्या नियमाचे पालन करण्यासाठी, त्याचे अपघातामुळे होणारे परिणाम, इंधन बचतीचे महत्व, ई. बाबत मार्गदर्शन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जयंत सडमाके सहाय्यक वाहतूक अधीक्षक, संचालन सय्यद आसिफ वाहतूक नियंत्रक आणि आभार प्रदर्शन मनोहर वाने वाहतूक निरीक्षक यांनी केले.

