अनिल अडकिने नागपूर जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सावनेर:- नागपूर जिल्ह्यातील सावनेर कळमेश्वर तालुक्यातील निसर्गरम्य परिसरातील वातावरणाच्या ठिकाणी हिंदी चित्रपटाची शूटिंग मोठ्या उत्साहात सुरू आहे. चित्रपटाची शूटिंग उमरी खदान, उमरी रिसॉर्ट, सावनेर शहरात, बिडगाव खेडोपाडी, मोहपा या ठिकाणी सुरू आहे. या चित्रपटाचे नाव “होगा क्या अब” असे असून या चित्रपटाला सावनेर कळमेश्वर तालुक्यात आणण्याचे मोठे श्रेय कोदेगाव येथील संजय बन यांना जात आहे.
या चित्रपटाचे मुख्य निर्माता सुरज विश्वकर्मा तर डायरेक्टर हेमंत कुमार आहेत. तसेच मुख्य अभिनेत्याच्या रोल विकी पवार साकारणार असून मुख्य अभिनेत्रीची भूमिका आंचल साकारणार आहे. यामध्ये सावनेरचे अनिल अडकिने, युवराज मेश्राम, शंकर निर्बट, मिना खापर्डे असे चार कलाकार असणार आहे. नागपूरचे सिने कलाकार सचिन गिरी पोलीस निरीक्षकाचा मोठा रोल मिळाला असून उज्वला रोडगे या महिला पोलीस कॉन्स्टेबलचा रोल करित आहेत.
या चित्रपटाचे मुख्य अभिनेता विकी पवार यांची महाराष्ट्र संदेश न्युजच्या प्रतिनीधीनी मुलाखत घेतली त्यावेळी ते म्हणाले की, मी मध्यप्रदेश बालाघाट येथील रहिवासी असून सध्या 10 वर्षापासून नागपूरला राहत आहे. चित्रपट करण्याची आवड तर लहानपणा पासूनच होती पण तिन ते चार वर्षापासून रेगुलर कार्य करीत आहे. दोन चित्रपट रिलीज झालेले आहेत. दोन चित्रपट रिलीज साठी तयार आहेत. “होगा क्या अब” ह्या एका चित्रपटाची शूटिंग सुरु आहे. असे मी पाच पिक्चर तयार केलेले आहे. पाच चित्रपट पैकी तीन चित्रपट मध्ये माझ्या मुख्य भूमिका आहेत व बाकी दोन चित्रपटात सहाय्यक अभिनेत्याचा रोल केलेला आहे. फिल्म सिटी मध्ये येण्याचा अगोदर मी अल्बम सॉंग सुद्धा केलेले आहे. दोन पिक्चर थेटर रिलीज झालेले आहेत बेरा आय अघोरी, दिल से रु तक अजून एक पिक्चर आहे थ्री लव आहे.
एप्रिल महिन्यामध्ये ‘माझी क्यू रंगे हो मुझे प्यार के रंग’ मे रिलीज होत आहे. ‘होगा क्या अब’ नंतर समोरचा चित्रपट राहील असली चेहरा ह्या चित्रपटाच्या शूटिंगसाठी नागपूर जिल्ह्यातील जितके पण चांगले सुंदर असे लोकेशन आहेत त्या ठिकाणी जाऊन आम्ही चित्रपट शूट करून पूर्ण करण्याच्या तयारीत आहोत.
सावनेरचे जितके सुद्धा कलाकार आहेत त्यांना सुद्धा आम्ही छोटा मोठा रोल देत आहोत तसेच नागपूर, मुंबई, बेंगलोर, दिल्ली, मध्य प्रदेश येथील कलाकार सुद्धा आहेत. एकूण आमच्यापाशी ८० ते १०० लोकांची टीम आहे. सुंदर असा एरिया लोकेशन असल्यामुळे आम्ही येथे शूटिंग करीत आहोत. संजय बन मुळे आम्हाला इथे पत्रकारांच्या रोल साठी, पोलीस व इतर कॅरेक्टरची सुविधा उपलब्ध करून देत असल्यामुळे हा पिक्चर आम्ही इथेच पूर्ण करू तसेच ही पिक्चर तीन लँग्वेज मध्ये छत्तीसगढी,भोजपुरी, हिंदी बोलेट फिल्म बनणार असून नंतर तिला दोन लँग्वेज मध्ये डब करणार. हाय बजेट ची पिक्चर असून तिला ऑल इंडिया रिलीज लवकरच करणार अशी माहिती पत्रकारांना दिली.
यावेळी उपस्थितांमध्ये संजय बन, युवराज मेश्राम, अनिल अडकिने, मीना खापर्डे, शंकर निर्बट, अमोल खांडेकर, मंगेश उराडे, तांदूळकर, राजूभाऊ कांबे, प्रोडूसर सुरज विश्वकर्मा,
डायरेक्टर हेमंत कुमार, हिरो विकी पवार, कोमिका आचल, कोमल राऊत, भूपेंद्र सिंग, अमित पटेल, संदीप त्रिपाठी व इतर कलाकार उपस्थित होते.

