Saturday, April 11, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्रीडा

हिंगणघाट मुस्लिम प्रीमियर लीग सीजन 2 ला भव्य प्रारंभ, पहिल्या दिवशी खेळले गेले चार रोमांचक सामने

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
February 3, 2025
in क्रीडा, वर्धा, हिंगणघाट
0 0
0
हिंगणघाट मुस्लिम प्रीमियर लीग सीजन 2 ला भव्य प्रारंभ, पहिल्या दिवशी खेळले गेले चार रोमांचक सामने
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- हिंगणघाट मुस्लिम प्रीमियर लीग (HMPL) सीजन 2 ला उत्साहात प्रारंभ झाला. या क्रिकेट स्पर्धेत एकूण 8 संघ सहभागी असून, त्यांना दोन गटांमध्ये विभागले गेले आहे. प्रत्येक संघ गट स्तरावर चार सामने खेळणार आहे. ही स्पर्धा केवळ क्रिकेटपुरती मर्यादित नसून, समाजातील तरुणांना खेळाशी जोडणे, त्यांचा शारीरिक व मानसिक विकास घडवणे आणि तंत्रज्ञानाच्या आभासी जाळ्यात अडकलेल्या तरुणांना मैदानी खेळाकडे वळवण्यासाठी महत्त्वाचे पाऊल आहे.

स्पर्धेच्या पहिल्या दिवशी चार सामने खेळले गेले. पहिल्या सामन्यात थंडर स्ट्रायकर आणि बाबा वॉरियर्स आमने सामने आले, ज्यामध्ये बाबा वॉरियर्स संघाने विजय मिळवला. दुसऱ्या सामन्यात मुजीब ज्वेलर्स विरुद्ध फॅशन पॉइंट रायडर्स आमने-सामने आले आणि फॅशन पॉइंट रायडर्सने हा सामना जिंकला. तिसऱ्या सामन्यात हॅलो हिटर्स आणि खान फायटर्स यांच्यात जोरदार लढत झाली, ज्यामध्ये हॅलो हिटर्स संघ विजयी ठरला. चौथा आणि शेवटचा सामना इम्रान प्रिन्स 11 आणि विदर्भ 11 यांच्यात झाला, ज्यामध्ये इम्रान प्रिन्स 11 संघाने विजय मिळवत दमदार सुरुवात केली.

या स्पर्धेला शहरभरात मोठा प्रतिसाद मिळत असून, प्रेक्षक मैदानावर उपस्थित राहून सामन्यांचा आनंद घेत आहेत. तसेच, लाईव्ह टेलिकास्टच्या माध्यमातून घरी बसून ही ही रोमांचक स्पर्धा पाहण्याची संधी मिळत आहे. स्पर्धेत भाग घेतलेल्या खेळाडूंनी या आयोजनाचे कौतुक केले असून, यामुळे केवळ खेळाची संधी नाही, तर एकमेकांमध्ये बंधुभाव वाढण्यास मदत होत असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.

ही स्पर्धा एकूण चार दिवस चालणार असून, दररोज रोमांचक सामने रंगणार आहेत. आता पाहण्यासारखे असेल की, या सिझनचे विजेतेपद कोणता संघ पटकावतो.

Tags: पहिल्या दिवशी खेळले गेले चार रोमांचक सामनेहिंगणघाट मुस्लिम प्रीमियर लीग सीजन 2 ला भव्य प्रारंभ
Previous Post

वर्धा जिल्हाच्या विकासासाठी भरीव तरतूद देण्याचा प्रयत्न: उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार

Next Post

शेकापूर ते वेणी रोडवर टाटा एस मधून उतरताना पडल्याने १० वर्षीय बालकाचा दुर्दैवी मृत्यू, तर १२ वर्षीय बालक जखमी.

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
शेकापूर ते वेणी रोडवर टाटा एस मधून उतरताना पडल्याने १० वर्षीय बालकाचा दुर्दैवी मृत्यू, तर १२ वर्षीय बालक जखमी.

शेकापूर ते वेणी रोडवर टाटा एस मधून उतरताना पडल्याने १० वर्षीय बालकाचा दुर्दैवी मृत्यू, तर १२ वर्षीय बालक जखमी.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In