आसमा सय्यद पुणे जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन पुणे:- पुण्यात सकाळी मॉर्निंग वॉकला जाणार्या महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी लुटणाऱ्या सराईत चोरट्याला पुणे शहर भारती विद्यापीठ पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहे. राजू महादेव डेंगळे वय 22 वर्ष, रा. प्रतिकनगर, गोकुळनगर, कात्रज कोंढवा रोड असे आरोपी चोराचे नाव आहे. ही घटना 30 जानेवारीला सकाळी 6.00 वाजताच्या सुमारास घडली आहे.
प्राप्त माहितीनुसार, 30 जानेवारीला सकाळी 6.00 वाजता महीला मॉर्निंग वॉकसाठी घरातून बाहेर पडल्या होत्या. त्रिमूर्ती चौकाचे पुढे प्रज्ञा वॉशिंग सेटर समोर दुचाकीवरुन आलेल्या दोघांनी त्यांच्या गळ्यातील 40 हजार रुपये किमतीची सोन्याची चेन हिसका मारुन लुटून नेली होती. त्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली होती. त्यानंतर या महिलेने पोलीसात जाऊन आरोपि विरुद्ध तक्रार दाखल केली होती.
यावेळी पोलिसांनी आरोपी विरोधात गुन्हा दाखल करून गुन्हा गंभीर स्वरुपाचा असल्याने वरिष्ठ पोलीस निरीक्षक साळगांवकर यांनी तपास पथकाला आरोपींचा तात्काळ शोध घेण्याबाबत मार्गदर्शन केले. तपास पथकाचे अंमलदार मंगेश पवार, निलेश खैरमोडे, सचिन गाडे हे तांत्रिक विश्लेषणाच्या आधारावरुन आरोपींचा शोध घेत असताना हा गुन्हा रेकॉर्डवरील गुन्हेगार राजू डेंगळे याने केल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी त्याचा शोध घेऊन कात्रज कोंढवा रोडवर त्याला पकडले. त्याच्याकडून चोरलेली 1 तोळे वजनाची सोन्याची चैन जप्त केली आहे. त्याने आणखी गुन्हे केले आहेत का याचा तपास सुरु आहे.
ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त प्रविणकुमार पाटील, पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील, सहायक पोलीस आयुक्त राहुल आवारे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक सावळाराम साळगांवकर, गुन्हे निरीक्षक राहुलकुमार खिलारे, पोलीस उपनिरीक्षक निलेश् मोकाशी, पोलीस अंमलदार मंगेश पवार, निलेश खैरमोडे, सचिन गाडे, चेतन गोरे, महेश बारवकर, सचिन सरपाले, मितेश चोरमोले, अभिनय चौधरी, सागर बोरगे यांच्या पथकाने केली आहे.

