*दादालोरा खिडकीच्या माध्यमातून प्रभारी पोलीस निरीक्षक दिपक सोनुने यांचे हस्ते साहित्य वितरण*
मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मो. नं. 9420751809.
अहेरी उपविभागीय अंतर्गत येत असलेल्या पेरमिली पोलीस स्टेशन हद्दीतील
आज दि.05/02/2025 रोजी अभियान दरम्यान पो. उप निरीक्षक दीपक सोनुने, सोबत पोउपनि. योगेश महाजन सह जि पो अंमलदार, SRPF चे अंमलदार CRPF , अधिकारि आणि अंमलदार यांनी उप पो स्टे पेरमीली हद्दीतील पो स्टे पासून 12 किमी अंतरावर असलेले मौजा-रापल्ली येथे ग्रामभेट घेतली असता सदर ग्रामभेट दरम्यान गावातील 80 ते 90 नागरिक उपस्थित होते. उपस्थित नागरिकांना विविध शासकीय योजना व रोजगार प्रशिक्षणा बाबत तसेच पोलीस दादालोरा खिडकीच्या माध्यमातून राबविले जाणारे विविध उपक्रम व प्रशिक्षण याबाबत माहिती देण्यात आली व त्याचा लाभ घेण्याचे आवाहन व मार्गदर्शन करण्यात आले तसेच नागरिकांसोबत स्थानिक भाषेत संवाद साधण्यात आला.
सदर वेळी नागरीकांना पुढीलप्रमाणे साहित्य वाटप करण्यात आले.सदर वाटप दरम्यान
साडी. 25 नग
पाणी बॉटल 25 नग
वही पेन 15 नग
🛑ग्रामभेटी दरम्यान नागरिकांनी पुढील समस्या मांडल्या:-
1) मौजा. पेरमिली ते रापल्ली असलेल्या कच्चा रस्त्याचे काम लवकर पुर्ण करून मिळावे.
2) शासकीय योजनांच्या माध्यमातून तयार करण्यात आलेल्या विहिरीवर पंप नसल्याने सोलर पंप बसवून मिळावे.
3) गावात पिण्याच्या पाण्यासाठी असलेले सोलारपंप दुरुस्त करुन मिळावे.
सदर समस्यांच्या निराकरण करण्याकरिता संबंधित विभागाशी पत्रव्यवहार करण्याची तजविज ठेवली आहे. या वेळी गावातील नागरिक, महिला तसेच शाळकरी विध्यार्थी मोठया प्रमाणात उपस्थित होते.

