मुकेश चौधरी कार्यकारी संपादक
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- हिगणघाटच्या मातीत जन्मलेल्या आणि आपल्या रुग्णसेवाने अवघ्या विदर्भाला आपल्या कवेत घेणाऱ्या गजू कुबडे याच्या रुग्णसेवेच्या कार्याला आता जिल्ह्याच्या, प्रादेशिक अस्मितेच्या सीमा रेषा राहिलेल्या नाहीत. त्या आता महाराष्ट्र भर पोहचल्या आहेत.
गजू कुबडे त्यांच्या व्हॉटसअप मोबाईल वर 9921681001 या नंबर वरून नाशिक येथून एका अनोळखी इसमच्या एक मेसेज आला. (त्यांना विचारले असता त्यांनी सांगितले कि तुमच्या कामाची व्याप्ती फेसबुक व पेपर च्या माध्यमातून वाचली आहे) त्यात त्या व्यक्तीने लिहिले आहे कीं, भाऊ माझ्या मित्राच्या मुलाचे वालचे ऑपरेशन करायचे आहे. नाशिक मध्ये कुठे मदत होईल का गरीब परिस्थिती आहे त्यांची खूप, चार वर्षाचा मुलगा आहे.
हा मेसेज चक्क एका अनोळखी व्यक्तीने नाशिक वरून गजूभाऊला पाठविला आणि हा मेसेज वाचून रुग्णमित्र हें तातडीने त्या अनोळखी असलेल्या चार वर्षाच्या मुलाच्या नि:शुल्क ऑपरेशनसाठी सज्ज झाले आहेत. म्हणतात ना कीं हरिणाच्या बेंबीतील कस्तुरीचा सुगंध त्याला कळत नाही. पण तो सुगन्ध आसमंत सुगंधित करून टाकतो. तसेच या मातीच्या सुपुत्राच्या रुग्णसेवे बाबत आहे. अवघा महाराष्ट्र आणि गोरगरीब रुग्णा पर्यंत आता एकच नाव ते म्हणजे गजूभाऊ कुबडे.
यासाठी करावा लागतो सर्वस्वाचा होम. स्वतःच्या सुख दुःखाला बाजूला ठेऊन समाजातील वंचितांच्या दैन्याचा, दारिद्र्याचा विचार हा अग्रक्रमाने समोर ठेवला तर जातं, धर्म, प्रांत,भाषा या सर्व सीमारेषा पुसून उरतात ती केवळ माणुसकीची मूल्ये. संतांची शिकवण, आई-वडिलांचा आशीर्वाद, अर्धांगिनीची प्रबळ साथ ह्या समर्थ भांडवलावर आज येथील एक कोणतेही ग्लॅमर नसलेला, पाठीशी राजकीय वरदहस्त नाही. आहे ते केवळ जनतेचे प्रेम आणि सदिच्छा! ह्या ताकदीवर गजू कुबडे नावाचा अवलिया आपल्या निःस्वार्थ कार्याने महाराष्ट्राच्या सीमारेषा ओलांडतो आहे हें आपल्या साठी भूषणास्पद आहे. अशा ह्या रुग्णमित्राची मुकपणे केवळ आपण आरती ओवाळावी एवढंच.

