महाराष्ट्र संदेश न्युज प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन देहू:- महाराष्ट्रातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. संत तुकाराम महाराजांचे 11 वे वंशज म्हणून ओळख असलेले शिरीष महाराज मोरे वय 30 वर्ष यांनी आत्महत्या केली आहे. त्यांनी आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपली आहे. त्यांनी आत्महत्या करण्याचा निर्णय का घेतला? असे समस्त महाराष्ट्रात विचारले जात होते. असे असतानाच आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी लिहिलेल्या चार चिठ्ठ्या सापडल्या आहेत. या सुसाईड नोटमध्ये त्यांनी मन सुन्न करणारी सत्य समोर आले आहे. सोबतच त्यांनी आत्महत्येचं कारणही सांगितलं आहे.
सकाळी खोलीचे दार उघडलेले दिसून आले नाही आवाज दिला पण उत्तर आल नसल्याने दार तोडले असता त्यांनी उपरण्याच्या साह्यानं गळफास घेतल्याचं समोर आलं. आर्थिक विवंचनेतून हे पाऊल उचलल्याचं सुसाईड नोटमध्ये शिरीष महाराज मोरे यांनी नमूद केलं होतं. 20 दिवसांपूर्वी त्यांचा साखरपुडा झाला होता तर एप्रिल महिन्यात त्यांचा विवाह होणार होता. मात्र, त्यांच्या टोकाच्या निर्णयामुळे त्याच्या कुटुंबियास आत्पस्वकियांना मोठा धक्का बसलाय. दरम्यान, शिरीष महाराज मोरे यांनी कर्ज कशासाठी घेतलं होतं याची माहिती देखील समोर आलीये.
शिरीष महाराज मोरेंनी कर्ज कशासाठी घेतलं?
1. कोरोनाच्या आधी शिरीष महाराज मोरे व्यवसाय क्षेत्रात उतरले होते. कागदी पिशवी बनवणे अन् त्यावर छपाई करुन देण्याचा व्यवसाय सुरु केला. यासाठी त्यांनी कर्ज उचलले होते. मात्र कोरोनाच्या काळात हा व्यवसाय बंद पडला अन् महाराजांना पहिलं आर्थिक नुकसान झेलावं लागलं. 2. अडीच वर्षांपूर्वी हॉटेल क्षेत्रात उतरण्याचं ठरवलं. नादब्रह्म ईडलीची काही लाख रुपये मोजून फ्रेंचायजी घेतली. पिंपरी चिंचवड परिसरात हा नवा व्यवसाय सुरु केला, जो आज ही सुरु आहे. आधीचं कर्ज असताना पुन्हा या व्यवसायासाठी ही महाराजांनी कर्ज घेतलं. 3. काही महिन्यांपूर्वी एक मजली घर बनवलं, त्यासाठी ही लाखांमध्ये खर्च झाला. 4. अलीकडेच महाराजांनी चार चाकी गाडी ही घेतली, त्यासाठी ही कर्ज घ्यावं लागलं.
शिरीष महाराज मोरेंनी जगाचा निरोप घेताना, माझ्या मागे प्रत्येकाने दिलेलं कर्ज फेडावं. असं म्हणून कोणावर अन्याय होणार नाही, याची दक्षता ही घेतली. या मार्फत शिरीष महाराजांनी जगद्गुरू संत तुकाराम महाराजांची परंपरा जपली. मात्र त्यांनी आर्थिक विवंचनेतून आत्महत्या केली. असं म्हणत चुकीची चर्चा घडवण्यात येत असल्याचं मोरे कुटुंबियांचे म्हणणे आहे. अनेकजण किर्तनावर मोठे होत आहेत, मात्र शिरीष महाराजांनी आजवर मोफत किर्तनसेवा केलीये. फक्त यावेळी जरा गडबड झाली अन् दुःखाचा डोंगर वारकरी संप्रदायावर कोसळला. शिरीष महाराजांनी एकवेळ आवाज दिला असता तर अख्खा महाराष्ट्र मदतीला नक्कीच धावला असता. अशी खंत ही देहूकर व्यक्त करतायेत. शिरीष महाराजांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठ्यांचा आधार घेत, देहूरोड पोलीस पुढील तपास करत आहेत.
चिठ्ठीमध्ये नेमकं काय आहे? “माझी लाडकी पिनू, प्रियांका…खरं तर तुझा आता कुठं हात पकडला होता. आपलं आयुष्य आता कुठं फुलायला सुरुवात झाली होती आणी मी जातोय. तुझ्यासोबत थोडा काल घालवायचा होता म्हणून तुला भेटून मग ही चूक करत आहे. मी हात जोडून माफी मागतो. माफ कर. आयुष्यात सर्वांत जास्त मी अपराधी कोणाचा असेल तर तुझा आहे. तुला न्याय देऊ शकलो नाही,” असं शिरीष महाराजांनी आपल्या सुसाईड नोटमध्ये लिहिलं आहे.
तुझी सगळी स्वप्न तोडून जातोय, “माझ्या वाईट कालात तू माझ्यासोबत उभी राहिलीस. माझ्या प्रत्येक निर्णयात साथ दिलीस. मी हात सोडला तर माझी वाट पाहिलीस. माझ्या संघर्षात उभी राहणारी माझी सखे तू माझ्या चांगल्या वेळेची हकदार होतीस. मला माफ कर. तुझी सगळी स्वप्नं तोडून जातोय,” असंही शिरीष महाराजांनी म्हटलंय.
एवढा काळ थांबलीस, आता… “कुंभमेळा राहिला, वारी राहिला, किल्ले राहिले, भारत दर्शन राहिलं. सगळंच राहिलं. मी काहीही न देता माझ्या झोळीत भरभरून दान टाकलंस तू. तू खूप गोड आहेस. निस्वार्थी आहेस. खूप काही बोलता येईल. जप स्वत:ला. एवढा काळ थांबलीस. आता मीच नसेल त्यामुळे थांबू नको. पुढे जा. खूप मोठी हो. आणि हो खूप झाले कष्ट, आता वर्क फ्रॉम होम हो. माझ्याकडून खूप वेळा खूप साऱ्या चुका झाल्या. मला माफ कर… तुझाच अहो.. शिरीष” असंही शिरीष महाराजांनी आपल्या सुसाईड नोटमध्ये म्हटलंय.
तिच्यासाठी चांगला मुलगा बघा‘ मित्रांना उद्देशून लिहिलेल्या दुसऱ्या चिठ्ठीत त्यांनी प्रियांका यांचे लग्न लावून देण्याचीही विनंती केली आहे. “…आणि हो आमची नवरीबाई. तिची सगळी स्वप्नं उद्ध्वस्त करून मी चाललो आहे. खूप गोड आहे प्रियांका. तिला कधी वेळच देता आला नाही. तिच्यासाठी चांगला मुलगा बघा. नाहीतर ती लग्न करणार नाही. हात जोडून माफी मागतो,” असंही शिरीष मोरे यांनी म्हटलंय. दरम्यान त्यांनी एका चिठ्ठीमध्ये आत्महत्येचं नेमकं कारण सांगितलेलं नाही. मात्र त्यांनी चिठ्ठ्यांमध्ये कर्जाचा उल्लेख केला आहे. त्यामुळे त्यांनी आयुष्य संपवलं असावं असा प्राथमिक अंदाज लावला जात आहे. सोबतच त्यांनी आयुष्याची इतिकर्तव्यता संपली आहे, समजून पूर्णविराम देत आहे, असं म्हटलंय.

