अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- स्थानीय रा सू बिडकर कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय हिंगणघाट येथे राष्ट्रीय सेवा योजना चा सात दिवसीय विशेष श्रमसंस्कार शिबिराचे नांदगाव (बोरगाव) येथे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष रा सू बिडकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बालाजी राजूरकर तर प्रमुख उपस्थिती उपविभागीय पोलिस अधिकारी रोशन पंडीत, नाक् समन्वयक डॉ. शरद विहिरकर, इतिहास विभाग प्रमुख डॉ. अनिल बाभळे, मुख्याध्यापक अनिल कारामोरे यांची होती.
या श्रमसंस्कार शिबिरात पर्यावरण आणि प्रदूषण यावर डॉ. किशोर भुते व डॉ. जयंत शेंडे यांनी मार्गदर्शन केले.यावेळी सायबर सुरक्षा यावर उपपोलीस निरीक्षक सुनीता ठाकरे आणि जिल्हा बाल विकासच्या अध्यक्षा रश्मी रघटाटे यांनी मार्गदर्शन केले. जादुटोणा कायदा व अंधश्रद्धा निर्मूलन वर पंकज वंजारे, नीलेश गुळघाने यांनी मार्गदर्शन केले. विषमुक्त नैसर्गिक शेती यावर मनोज गायधने, पशुधन यावर पशुसंवर्धन अधिकारी डॉ. ज्योती चव्हाण, रक्तदान विषयी डॉ. रवी भांगे यांनी मार्गदर्शन केले. मुलगी वाचवा मुलगी शिकवा यावर प्रा विकास बेले, पोलिथीन मुक्त व स्वच्छ भारत यावर मार्गदर्शन केले. यासोबत आरोग्य, पशू जनहित करन आणि रक्तदान करण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्यक्रम अधिकारी डॉ राजु निखाडे, संचालन डॉ गजानन बक तर आभार प्रा. विलास बेले ने मानले.

