पल्लवी मेश्राम उपसंपादक नागपूर
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर:- येते भारत विरुध्द इंग्लंड एकदिवसीय मालिकेच्या पहिला सामना फेब्रुवारी रोजी नागपूर येथील विदर्भ क्रिकेट असोसिएसनच्या मैदानावर खेळला जाणारा आहे. या सामन्याबद्दल क्रिकेट प्रेमींमध्ये मोठा उत्साह आहे आणि त्यामुळे तिकिटांची मागणी प्रचंड वाढली आहे. या तिकिटांच्या मागणीनंतर, बेकायदेशीरपणे तिकिटांचा काळाबाजार सुरू झाला होता. त्यावर पोलिसांनी कडक कारवाई केली आहे.
व्हीसीए स्टेडियमजवळ काही लोक तिकिटे काळ्या बाजारात विकत होते, याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी त्वरित कारवाई करत दोन जणांना रंगेहाथ पकडले आहे. अटक केलेल्या आरोपींची ओळख पटली असून त्यांचे नाव मनोहर हेमनदास वांजानी वय 62 वर्ष, गांधीबाग नागपूर आणि राहुल भाऊदास रामटेके 38 वर्ष, स्मृती लेआउट दत्तवाडी नागपूर आहे.
सोमवारी व्हीसीए स्टेडियममध्ये तिकिटांचा व्यवहार सुरू होता आणि मोठ्या प्रमाणात लोकांची गर्दी होण्याची अपेक्षा होती. यामुळे पोलिसांनी तिकिटांच्या काळाबाजारावर नियंत्रण ठेवण्यासाठी कडक सुरक्षा व्यवस्था केली होती.

