मुकेश चौधरी कार्यकारी संपादक
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- तालुक्यातील अनेक नदी घाटात अवैध रेती उत्खनन करून मोठ्या प्रमाणात उपसा करून तस्करी सुरू आहे. दिवसा आणि रात्री सुरू असलेल्या रेती तस्करीला महसून विभाग आणि पोलीस प्रशासन लगाम घालण्यात अयशस्वी ठरत असल्यामुळे त्यांच्यावर मोठे प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे.
त्यामुळे शिवसेनेचे तालुका प्रमुख सतीश धोबे यांनी हिंगणघाट तहसीलदार यांच्या मार्फत उपविभागीय अधिकारी यांना विनंती केली आहे कि, शेकापूर (बाई) च्या रेती घाटावरून रात्रीच्या वेळी मोठया प्रमाणावर रेती चोरी होत असून सरकारचा महसूलचे नुकसान मोठया प्रमाणावर होत आहे. शिवसेना उबाठा पक्षाकडे दोन दिवसांपूर्वीच सूचना मिळाल्या होत्या २० ते २५ टिप्पर आणि ट्रॅक्टर शेकापूर रेती घाटावर चोरीची वाहतूक करण्यासाठी तयार आहे. काही गाड्या जेसीबी च्या माध्यमातून रेती भरून निघाल्या आहे या संदर्भात हि माहिती उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदार याना कळविले परंतु कार्यवाही अजिबात झाली नाही. त्याच प्रमाणे वडनेरचे ठाणेदार लोकरे यांना सुध्दा दूरध्वनीच्या माध्यमातून सांगितल्यावर हि ठाणेदार यांनी तातडीने कार्यवाही करणे आवश्यक होते परंतु त्यांनी तसे केली नाही आणि या अधिकार्याच्या निष्काळजी मनाव कि अजून काही. रेती माफिया टीम वर कार्यवाही आता केली नाही तर एक दिवस बीड सारखे प्रकरण होण्यास वेळ लागणार नाही?
शिवसेना नेत्यांनी आरोप केला आहे की, अधिकारी वर्ग सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांच्या दबावात येऊन या रेती माफियांना वाचविण्याचे काम करीत आहे आणि वरिष्ठांना दाखविण्यासाठी एक दोन ट्रॅक्टरवर कार्यवाही करून प्रशासन जागृत आहे असे दाखविण्याचे केविलवाणा प्रयत्न करतांना दिसत आहे. शिवसेनेच्या वतीने आपल्याला विनंती आहे कि असल्या रेती माफिया वर कार्यवाही झाली नाही तर शिवसेना आपल्या कार्यालया समोर धरणे आंदोलन करण्यात मागे पुढे पाहणार नाही. अशा इशारा यावेळी शिवसेनेकडून दिलेल्या निवेदनच्या माध्यमातून देण्यात आला.
या संदर्भात जिल्हाधिकारी वर्धा तसेच जिल्हा पोलीस अधीक्षक वर्धा याना निवेदनाचे प्रत पाठविण्यात आली आहे. निवेदन देतांना माजी नगरसेवक मनीष देवडे, उप तालुका प्रमुख प्रकाश अनासाने, हिरामण आवारी, दिनेश धोबे, शहर संघटक गजानन काटवले, नितीन वैद्य, अविनाश धोटे, शितल चौधरी, सचिन मुडे, विनोद ढगे, नरेश भजभुजे उपस्थित होते.

