पल्लवी मेश्राम उपसंपादक नागपूर
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर:- महाराष्ट्र राज्य वन विभागातील वनमजूरांच्या विविध मागण्यासाठी नागपूर येथील विधानसभा समोर बेमुदत आमरण उपोषण करण्यात येत आहे. महाराष्ट्र राज्य वन विभागातील वनमजूरांना शासन सेवेत कायम करणे संदर्भातील फाईल क्रमांक १९३ फ-१२ अनेक वर्षांपासून मंत्रालयीन वने यांच्या दालनात पडून आहे तरी त्या फाईलला तात्काळ मंजुरी मिळावी.
२) संघटनेने आपल्या कार्यालयास सादर केलेल्या नागपूर वनवृत्तातील वनमजुरांच्या यादीप्रमाणे अहवाल आपल्या कार्यालयास अद्याप प्राप्त झाला नसून तो अहवाल आपल्या कार्यालयामार्फत मागून घेऊन शासनास सादर करण्यात यावा.
३) कोल्हापूर कार्यालयाकडून वन मजुरांना शासन सेवेत कायम करणे संदर्भातील अहवाल आपल्या कार्यालयास प्राप्त झाला असून वनपरिक्षेत्र कार्यालयाकडील रोखड वहीमध्ये एका वन मजुराच्या नावासमोर इतर असे नमूद केलेले आहे तरी ते संघटनेने सादर केलेल्या यादीतीलच वन मजूर असून त्यांच्याकडून तसे हमीपत्र घेऊन त्यांचे दिवस ग्राह्य धरून त्यांना शासन सेवेत कायम पणाचा फायदा देण्यात यावा कारण रोकड वही वरती एका वनमजुराचे नाव असल्यामुळे शासन नियमाप्रमाणे नाव असलेलेच वनमजूर कायम करण्यात आले व इतर मध्ये नावे असल्यामुळे त्यांचे दिवस भरले नाहीत व ते शासन सेवेत कायम होण्यास पात्र असून देखील तेवनमजूर कायम पणाचे फायदे घेण्यापासून वंचित राहिले आहेत त्यांना शासन सेवेत कायम करून शासन नियमाप्रमाणे त्यांचे वेतन व भत्ते देण्यात यावेत.
४) कोर्ट केस प्रकरणातील वनमजुरांच्या नावाची यादी कोल्हापूर कार्यालयात सादर करण्यात आली आहे तरी यादीप्रमाणे सर्व वनमजुरांचा अहवाल मागवून घेऊन त्यांना बारमाही रोजगार उपलब्ध करून देण्यात येऊन त्यांचा पगार त्यांच्याच नावे त्यांचे बैंक खातेवर जमा करण्यात यावा व त्यांना कोणत्याही परिस्थितीत कामावरून कमी करण्यात येऊ नये तसेच त्यांचा अनेक महिन्यांचा पगार संबंधित कार्यालयाकडून देण्यात आलेला नाही तो पगार त्यांना तात्काळ देण्यात यावा.
५) संघटनेने आपले कार्यालयाकडे वनमजुरांची माहिती सण १९८९ ते सन २०२४ पर्यंत ची संबंधित कार्यालयाकडून मागवण्याची विनंती केली होती परंतु संबंधित कार्यालयाने चुकीची अर्धवट माहिती आपले कार्यालयास पाठवण्यात आली आहे सध्या मजूर कामावर असून देखील कामावर नाहीत असा शेरा देण्यात आला आहे तरी आपल्या कार्यालयामार्फत मागविण्यात आलेल्या अ, ब, क मुद्द्यांची माहिती संबंधित कार्यालया मार्फत परिपूर्ण मागवून घेऊन वनमजुरांना योग्य तो न्याय देण्यात यावा
६) सध्या उन्हाळ्याचे तसेच वन वनव्याचे दिवस सुरू झाले आहेत तरी वनमजुरांना रात्री अपरात्री वनवा विझवण्यासाठी भागात जावे लागते तरी त्यांना अनेक प्रकारच्या अडीअडचणींना तोंड द्यावे लागते त्यामुळे त्यांना ओळखपत्र व युनिफॉर्म संबंधित वनपरिक्षेत्र कार्यालयातील समित्यांच्या खात्यावरून खर्ची टाकून तात्काळ देण्यात यावेत.
१९८९ ते सन २०२५ आज अखेर पर्यंत वन विभागात प्रामाणिकपणे सेवेत कायम होण्याच्या अपेक्षित काम करीत आहेत परंतु अद्याप या वन मजुरीक न्याय मिळाला नाही तरी उपरोक्त विषयांचा गांभीर्यपूर्वक विचार करून अनेक वर्षापासून वनमजुरांचा रोजी रोटीचा प्रलंबित राहिलेला प्रश्न मार्गी लावून वनमजुरांना योग्य तो न्याय द्यावा अन्यथा प्रधान मुख्य वन संरक्षक (वनबल प्रमुख) कार्यालय नागपूर यांचे आवारात बेमुदत आमरण उपोषण तसेच धरणे आंदोलन संविधान चौक येथे सुरु करण्यात येईल जोपर्यंत वरील मागण्यांचा गांभीर्यपूर्वक विचार होत नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेतले जाणार नाही. वनमजुरांना आत्मदहन करण्यासारखी वेळ आणू नये याला सर्वस्वी जबाबदार संबंधित वन विभाग व महाराष्ट्र शासन राहील ही नम्र विनंती

