आसमा सय्यद, पुणे जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन पुणे:- घरगुती वादातून जन्मदात्या आईने आपल्या पोटच्या दोन चिमुरड्या लेकरांना पहाटेच्या साखर झोपेत गळा दाबून निर्घृण हत्या करून आपल्या पतीवरही कोयत्याने वार केल्याची अत्यंत थरकाप उडवणारी भयंकर घटना पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातून समोर आली आहे. या घटनेने संपूर्ण जिल्हा हादरुन गेला आहे. कोमल दुर्योधन मिंढे वय, 30 असे या महिलेचे नाव असून तिला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, पुण्याच्या दौंडमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. दौंड तालुक्यातील स्वामी चिंचोली मधील शिंदे वस्ती येथे एका महिलेने आपल्या दोन चिमुकल्या मुलांची गळा दाबून हत्या केली तसेच पतीवरही कोयत्याने वार केलेत. पती-पत्नीच्या वादातून आणि सासरच्या जाचाला त्रासून महिलेने हे टोकाचे पाऊल उचलण्याची माहिती मिळत आहे.
काल 8 फेब्रुवारी पहाटेच्या सुमारास ही धक्कादायक घटना घडली. दौंड पोलिसांनी आरोपी कोमल दुर्योधन मिढे या 30 वर्षीय महिलेला ताब्यात घेतलं आहे. शंभू दुर्योधन मीढे वय 1 वर्ष आणि पियू दुर्योधन मीढे वय 3 वर्ष अशी हत्या करण्यात आलेल्या मुलांची नावे आहेत. या महिलेने तिचा पती दुर्योधन आबासाहेब मीढे वय 35 वर्ष याच्यावरही कोयत्याने मानेवर व हातावर वार करून जखमी केलं आहे

