अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- तालुक्यातील माथनकर येथे सोशलमिडियाच्या इंस्टाग्रामच्या वादातून २३ वर्षीय तरुणांवर चाकूने हत्या केल्याची घटना ८ फेब्रुवारीला रात्री ११ वाजता उघडकीस आली आहे. मृत्यक तरुणाचे नाव हिमांशु किशोर चिमने असे आहे.
प्राप्त माहितीनुसार मृत्यक हिमांशु चिमने व यातील आरोपी मानव जुमनाके यांचा मागील एक ते दिड महिण्यापुर्वी इंस्टाग्रामवर ठेवलेल्या स्टोरी वरुन वाद झाल्याने हिमांशु हा त्याचे दोन मित्रांसोबत वाद मिटवनेकरीता मानव जुमनाके याने बोलाविले वरुन पिंपळगाव माथनकर येथे गेला असता तेथे मानव जुमनाके व हिमांशु चिमने यांच्यात पुन्हा शाब्दीक वाद झाला. तेव्हा मानव जुमनाके याने हिमांशु याला पकडुन ठेवले व अनिकेत जुमनाके याने हिमांशु याला चाकुने गळ्यावर व छातीवर वार करुन जिवानिशी ठार मारले.
सौ.सिमा किशोर चिमने यांच्या तक्रारीवरून हिंगणघाट पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दखल करण्यात आला असून पुढिल तपास पोलिस उपनिरीक्षक ताराम करीत आहे.

