किरण झांजे पुणे शहर प्रतिनिधी
अंमली पदार्थ विरोधी पथक १ गुन्हे शाखा पुणे शहर
दि. २७/०९/२०२२ रोजी पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड, अंगली पदार्थ विरोधी पथक व खंडणी विरोधी पथक २ गुन्हे शाखे कडील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार असे विमानतळ पोलीस स्टेशनचे हदीत पेट्रोलिंग करीत असताना बातगी मिळाली की, दोन इसम रेणुका निवास इमारतीचे लगतच असलेल्या सार्वजनिक रोडवर श्रीकृष्ण कॉलनी, वॉटरपार्क रोड, लोहगाव पुणे येथे सार्वजनिक रस्त्यावर अंगली पदार्थ विक्री करीता येणार आहे.
अशी बातमी मिळताच सदर ठिकाणी नगद पोलीस अधिकारी व पोलीस अंगलदार यांनी सापळा रचुन दोन संशयित इसमांना ताब्यात घेतले असता इसम नामे १ सोमराज सोहनलाल बिष्णोई, वय ३२ वर्षे, रा. रेणुका निवास फ्लॅट नं.५ श्रीकृष्ण कॉलनी, वॉटरपार्क रोड, लोहगाव पुणे गुळ रा. जिल्हा जोधपुर तहसिल लोहावट, पोस्ट, जेरीया, राज्य राजस्थान याचे ताब्यात कि.रु. १,१२,२५०/- चे ११ किलो २२५ ग्रॅम वजनाची अफीम ची बोंडे (दोडा चुरा) तसेच २. प्रेमाराम पुनाराम बिष्णोई वय ३२ वर्षे, रा. सदर याने त्याचे ताब्यात कि.रु. ५०,५००/- चे ०५ किलो ०५० ग्रॅम वाजनाची अफीम ची बोंडे (दोडा चुरा) असे एकुण १,६२,७५०/- ची १६ किलो २७५ अँग अफीग ची बोंडे (दोडा चुरा) हा अंगली पदार्थ मिळुन आल्याने तो पंचनाम्याने जप्त करण्यात आला असुन इसम नामे १. सोमराज सोहनलाल बिष्णोई २ प्रेमाराम पुनाराम बिष्णोई यांचे विरुद्ध विमानतळ पोलीस स्टेशन येथे गु.र.नं. ३७१ / २०२२ एन.डी.पी.एस. अॅक्ट कलग ८ (क), १७( ब ) २९ प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
वरील नमुद कारवाई ही मा. पोलीस आयुक्त, पुणे शहर, श्री अमिताभ गुप्ता, मा. पोलीस सह आयुक्त श्री संदिप कर्णिक, मा. अपर पोलीस आयुक्त, गुन्हे, श्री रामनाथ पोकळे, मा. पोलीस उप आयुक्त, गुन्हे, श्री. श्रीनिवास घाडगे, मा. सहा पो आयुक्त गुन्हे १ श्री गजानन टोम्पे यांचे मार्गदर्शना खाली अंमली पदार्थ विरोधी पथक १ व खंडणी विरोधी पथक २ गुन्हे शाखा पुणे शहर कडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. विनायक गायकवाड, वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री बालाजी पांढरे, सहा पोलीस निरीक्षक शैलजा जानकर, सहा पोलीस निरीक्षक लक्ष्मण ढेंगळे, पोलीस अंगलदार शैलेश सुर्वे अगोल पिलाणे, मनोजकुमार साळुंके, विशाल दळवीं, पांडुरंग पचार, सचिन माळवे, प्रदिण उत्तेकर, राहुल जोशी, संदेश काकडे, नितेश जाधव, योगेश मोहिते यांनी केली आहे.

