अनिल अडकिने नागपूर जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सावनेर ९ फेब्रुवारी:- सारस्वतपुर सावनेर येथे श्री. विश्वकर्मा मंदिर मध्ये श्री. चतुर्भुज शिवब्रह्मलिंग जलधारीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. ३ फेब्रुवारी ते १० फेब्रुवारी पर्यंत श्री.प्रभू विश्वकर्मा जयंती निमित्त श्री.शिवमहापुराण अमृतकथेचे आयोजन करण्यात आले. व्यासपीठाचार्य गुरुवर्य ह.भ.प.अनिल महाराज अहेर यांच्या मुखवाणीतून शिव कथेचे महत्त्व सांगत आहे.
८ फेब्रुवारीला एकादशीला शिवपार्वती यांचा विवाह सोहळ्या निमित्त ढोल ताशाचा गजरात मिरवणूक काढण्यात आली. सायंकाळी ७.३० वा.हजारो भक्ताच्या उपस्थितीत मंगलाष्टके म्हणण्यात आले. फुलाचा वर्षाव करीत विवाह सोहळा पार पडला. सर्वत्र उत्सहाचे वातावरण निर्माण झाले होते. विवाह सोहळ्यानंतर सर्वांना फराळाचा वाटप करण्यात आला.
सोमवार दि.१० फेब्रुवारीला सकाळी ७ वा.श्री प्रभू विश्वकर्मा यांचा अभिषेक सोहळा होईल.९ वा.पालखी मिरवणूक निघेल. दुपारी १२ ते ३ पर्यंत किर्तनकार प.पु.गुरुवर्य ह.भ.प.अनिल महाराज अहेर नागपूर यांचे काल्याचे किर्तन होईल. किर्तनानंतर लगेच महाप्रसाद दुपारी ४ ते ९ वाजेपर्यंत राहील व कार्यक्रमाची सांगता होईल.
जास्तीत जास्त भाविक मंडळींनी किर्तनाचा लाभ घेण्याचे आवाहन आयोजक प. पु.गुरुवर्य श्री.सेनाड महाराज व श्री.प्रभू विश्वकर्मा विकास मंडळ सावनेर यांनी केले आहे.

