युवराज मेश्राम प्रधान संपादक
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन विदर्भ:- गोंदिया जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. गोंदिया जिल्ह्याच्या गोरेगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीत येत असलेल्या देवटोला येथे शेत शिवार परिसरात एका 18 वर्षीय गर्भवती तरुनीची रविवारी हत्या करण्यात आली. त्यामुळे परिसरात एकच खळबळ माजली आहे. पौर्णिमा विनोद नागवंशी वय 18 वर्ष राहणार मानेकसा (कालिमाटी) आमगाव असे हत्या करण्यात आलेल्या तरुणीचे नाव आहे.
हत्या करण्यात आलेले तरुणीची ओळख पटल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेने घटनास्थळा वरून प्राप्त पुरावे तसंच परिसरातील लोकांची विचारपूस, संशयितांची पडताळणी, तांत्रिक विश्लेषण आणि सीसीटीव्ही कॅमेरे तपासले. शेत शिवारामध्ये जाळून हत्या करण्यात आलेल्या मुलीची ओळख पटवण्यात गोंदिया पोलिसांना यश आलं आहे. मुलीची ओळख पटल्यानंतर पोलिसांनी आरोपीच्या बेड्या ठोकल्या आहेत.
आरोपीपासून मुलगी गरोदर होती, त्यामुळे मुलीपासून सुटका करून घेण्यासाठी आरोपीने मुलीची हत्या केल्याचं पोलीस तपासात समोर आलं आहे. गोंदियाच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आरोपीला अटक केली आहे.
आरोपीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या: हत्या करण्यात आलेल्या पौर्णिमा विनोद नागवंशी ही तरुणी मानेकसा (कालिमाटी) आमगाव येथील असल्याचं पोलिसांना कळालं. यानंतर पोलिसांनी पौर्णिमाच्या आई-वडिलांची सखोल चौकशी केली. चौकशीनंतर पौर्णिमाच्या ओळखीचा असलेला पूर्वाश्रमीचा विट भट्टी मालक शकील मुस्तफा सिद्दीकीला ताब्यात घेण्यात आलं. 38 वर्षांचा शकील गोंदियाच्या गोविंदपूर रोडवरच्या मामा चौकातला रहिवासी आहे.
पौर्णिमाची आधी गळा आवळून हत्या केली, त्यानंतर तिचा मृतदेह जाळला, अशी कबुली शकीलने पोलिसांना दिली आहे. मृत्यू झालेली मुलगी शकीलपासून गरोदर होती. तसंच ती शकीलसोबत राहायला इच्छुक होती, पण मुलीपासून सुटका करून घेण्यासाठी शकीलने पौर्णिमाची हत्या केली.
पौर्णिमाची हत्या करण्यासाठी शकील तिला घेऊन देवटोला (म्हसगाव) शेत शिवारात घेऊन गेला. तिकडेच त्याने पौर्णिमाचा गळा दुपट्ट्याने आवळला, यानंतर त्याने पौर्णिमाच्या अंगावर चादर आणि तनस टाकून मृतदेह जाळून टाकला. गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर आरोपीला गोरेगाव पोलिसांच्या स्वाधिन करण्यात आलं असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

