प्रविण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- येथून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. वर्धा येथील प्रसिद्ध बजाज इन्स्टिटयूट ऑफ टेक्नॉलॉजी महाविद्यालयात वसतिगृतील मेसचे जेवणानंतर अनेक विद्यार्थ्यांना विषबाधेचा त्रास सुरू झाला आहे. जेवणानंतर या विद्यार्थांना मळमळ आणि उलटी अशा त्रास सुरू झाल्याने वसतिगृहात एकच खळबळ माजली होती.
या विद्यार्थांना तडकाफडकी शहरातील खासगी रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. त्यात विद्यार्थ्यांच्या पालकांनी वसतिगृहात गंभीर आरोप करत मेसचे जेवण केल्यावर विद्यार्थ्यांना मळमळ, उलटी होण्याचे प्रकरणी तक्रार करूनही मेसवर कारवाई होत नसल्याचा आरोप केला आहे. तसेच प्राचार्यसह कॉलेज प्रशासनाचे दुर्लक्ष देखील केल्याचा आरोप केला आहे. धक्कादायक बाब म्हणजे, लग्नात उरलेले जेवण विद्यार्थ्यांच्या ताटात वाढल्याचा आरोप पालकांनी केला आहे. आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी शाळेत भेट देत केली तपासणी केली आहे. पाण्याचे नमुने आरोग्य विभागाने घेतले असून अन्नाच्या नमुन्यासाठी एफडीआयला सूचना देण्यात आलेल्या आहेत.
काय आहे हे प्रकरण: वर्धा शहरातील पिंपरी मेघे परिसरात असलेल्या बजाज इन्स्टिटयूट ऑफ टेक्नॉलॉजी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना रविवारी रात्री मेसमधील जेवण केल्यानंतर विद्यार्थ्यांना पोटदुखीचा त्रास, मळमळ आणी उलटीचा त्रास होऊ लागला. विद्यार्थ्यांना त्रास होताच त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आले. विद्यालयातील एकूण 29 विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याची माहिती मिळाली आहे. 29 विद्यार्थ्यांपैकी 3 विद्यार्थी आणी 26 विद्यार्थिंनीचा समावेश आहे.
वसतिगृहावर पालकांनी उपस्थित केले प्रश्न चिन्ह: वसतिगृहातील मेस मध्ये विद्यार्थांना देण्यात येणाऱ्या जेवणाबाबत विद्यार्थ्यांकडून कॉलेज प्रशासनाला वारंवार तक्रार सुद्धा करण्यात आली होती. मात्र, याकडे सातत्याने दुर्लक्ष केलं जातं होते. मेसेच्या जेवण देणाऱ्या कंत्राटदाराचे केटरिंगचा सुद्धा व्यवसाय असून लग्नात किंवा समारंभात शिल्लक असलेले अन्न विद्यार्थ्यांना देत असल्याचा आरोप पालकांनी केला आहे. विषबाधा झाल्याची माहिती विद्यार्थ्यांच्या पालकांना मिळताच त्यांनी कॉलेज प्रशासनाला भेट दिली. विद्यार्थ्यांना जेवणातून होणाऱ्या त्रासाबद्दल वारंवार तक्रार करूनही याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोपही पालकांनी केला आहे.

