महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन महाकुंभ:- शिया वक्फ बोर्डाचे माजी अध्यक्ष यांनी एक महत्वपूर्ण घोषणा केली आहे. मुस्लिमांना घरवापसी करण्याचे खुले आवाहन केले आहे. इतकंच नाही तर त्यांनी इस्लाम धर्म सोडून सनातन हिंदू धर्म स्वीकारणाऱ्या मुस्लिमांना दरमहा 3000 हजार रुपये देण्याची घोषणाही त्यांनी केली आहे. मंगळवारी त्यांनी प्रयागराज येथे सुरू असलेल्या महाकुंभात पोहोचून संगमस्नान केले. यावेळी शिया वक्फ बोर्डाचे माजी अध्यक्ष असलेले वसीम रिझवी आता हिंदू धर्म स्वीकारलेल्या जितेंद्र नारायण त्यागी म्हणाले.
इस्लाम धर्मातून सनातन हिंदू धर्म स्वीकारणाऱ्यांना दरमहा 3000 हजार रुपये दिले जातील आणि त्यांना व्यवसाय करण्यासाठी ही मदत केली जाईल, जितेंद्र नारायण त्यागी यांनी सांगितले की, आज संगम स्नान केल्यानंतर त्यांना खूप आनंद होत आहे. मी या पवित्र भूमीवरील देशभरातील मुस्लिमांना विनंती करतो की, त्यांनी सनातन धर्मात परतण्याच्या संदर्भात विचार करावा. मी माझ्या मित्रांच्या माध्यमातून एक संस्था तयार करत आहे, आमच्या संस्थेच्या माध्यमातून सनातन धर्मात परतलेल्या मुस्लिम कुटुंबांना दरमहा 3000 हजार रुपये देण्यात येतील. सनातन धर्मात पूर्णपणे स्थायिक होईपर्यंत ते तीन हजार रुपये देतील. ज्यांना व्यवसाय करायचा आहे त्यांनाही व्यवसायात मदत केली जाईल.
त्यांनी म्हटले की, मुस्लिम लोकांनी मूलतत्त्ववादी आणि जिहादी मानसिकतेतून तुम्हाला बाहेर पडावे लागेल. आपल्या आनंदाने सनातन धर्माकडे परत या. सनातन धर्म तुमचे स्वागत करतो. उत्तर प्रदेश शिया वक्फ बोर्डाचे माजी अध्यक्ष वसीम रिझवी यांनी तीन वर्षांपूर्वी इस्लाम धर्म सोडून सनातन धर्म स्वीकारला होता. धर्म बदलल्यानंतर त्यांनी आपले नावही वसीम रिझवी वरून जितेंद्र नारायण सिंह त्यागी असे बदलले. जुना आखाड्याचे महामंडलेश्वर नरसिंहानंद गिरी यांनी त्यांचे सनातन धर्मात धर्मांतर करून त्यांना नवे नाव दिले होते.
धर्मांतर केल्यानंतर रिझवी यांनी सनातन धर्म जगातील सर्वात जुना धर्म असल्याचे सांगितले. वसीम रिझवी यांनी सनातन धर्म स्वीकारल्यानंतर त्यांची शुद्धी करण्यात आली होती. हवन-यज्ञही करण्यात आला होता.
या अगोदर शिया वक्फ बोर्डाचे माजी अध्यक्ष वसीम रिझवी यांनी कुराणातील 26 आयात काढून टाकण्याची मागणी करणारी जनहित याचिका सुप्रीम कोर्टात दाखल केली होती, ज्याच्या संदर्भात शिया आणि सुन्नी समुदायाच्या उलेमांनी त्यांना इस्लाममधून बाहेर करण्याचा फतवा जारी केला होता. त्यात केवळ जनताच नाही तर वसीम रिझवीचे कुटुंबीयही त्याच्या विरोधात गेले होते. त्यांचा आई आणि भावाने नाते तोडले होते.

