अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- हिंगणघाट अधिवक्ता संघाच्या नवीन कार्यकारिणीची निवडणूक दिनांक ७ फेब्रुवारी २०२५ रोजी झाली. या निवडणुकीत संदिप प्र. देवगिरकर हे अध्यक्षपदी विजयी झाले. या निवडणुकीत अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, सहसचिव, कोषाध्यक्ष आणि ग्रंथपाल या पदांसाठी निवडणूक प्रक्रिया घेण्यात आली होती.
अभिवक्ता संघ हिंगणघाटच्या नवीन कार्यकारणीची निवड ही सर्व अभिव्यक्त्यांच्या मताने, निवडणूक पद्धतीने पार पडली. या निवडणुकीमध्ये अँड संदीप देवगिरकर हे त्यांच्याविरुद्ध असलेल्या उमेदवारांचा पराभव करून अभिवक्ता संघ हिंगणघाटच्या अध्यक्षपदी निवडून आले. तर अँड देवेंद्र गमे हे उपाध्यक्षपदी, अँड विजय ढेकले हे सचिवपदी निवडून आले. या निवडणुकीत महिला अभिवक्ता सारिका दाभाडे यादेखील सहसचिव पदी निवडून आल्या. तर दीपक कुलजले हे कोषाध्यक्ष आणि विजय जोशी हे ग्रंथपाल म्हणून निवडून आले.
या निवडणुक प्रक्रियेच्या माध्यमातून अभिवक्ता संघ कार्यकारणीची निवड झाली असून त्यांनी त्यांचा कारभार लगेच स्वीकारला. निवडून आलेल्या संपूर्ण कार्यकारणीचे सर्व स्तरातून अभिनंदन केले जात आहे.

