अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा, दि. 11:- उच्च माध्यमिक व माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा जिल्ह्यातील विविध केंद्रावर आयोजित करण्यात आल्या आहे. सदर परीक्षा केंद्रावर गैरप्रकार होऊ नये यासाठी परीक्षा कालावधीत केंद्राच्या परिसरात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 लागू करण्यात आले आहे.
इयत्ता 12 वीची दि.11 फेब्रुवारी ते 18 मार्च तसेच इयत्ता 10 वीची दि. 21 फेब्रुवारी ते 17 मार्च दरम्यान घेण्यात येत आहे. परीक्षांचे संचालन सुयोग्य प्रकारे व्हावे यासाठी परीक्षा कालावधीत सकाळी 9 ते सायंकाळी 6 या वेळात जिल्ह्यातील सर्व परीक्षा केंद्राच्या 100 मीटरच्या परिसरात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 अन्वये प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले आहे.
परिक्षेकरीता जिल्ह्यातील सर्व परीक्षा केंद्राच्या 100 मीटर परिसरात 2 अथवा त्यापेक्षा जास्त व्यक्तींच्या जमावावर आणि सदर परीक्षा केंद्राच्या 100 मीटरच्या परीसरात सर्व झेरॉक्स, मोबाईल, एसटीडी, आयएसडी, फॅक्स, संगणक, ई-मेल, इंटरनेट इत्यादी ईलेक्ट्रॉनिक उपकरणे व ईलेक्ट्रॉनिक सुविधांच्या वापरावर व परीक्षा केंद्राजवळील 100 मीटर परीसरातील केंद्र सुरु राहण्यांवर निर्बंध, प्रतिबंध लावण्यात आले आहे. या आदेशाचे काटेकोरपणे पालन करावे, असे जिल्हाधिकारी वान्मथी सी यांनी काढलेल्या आदेशात नमुद करण्यात आले.

