मुकेश चौधरी कार्यकारी संपादक
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- सार्वजनिक बांधकाम विभाग अंतर्गत सुरु असलेल्या कामाची चौकशी करण्याकरिता राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांच्या मार्गदर्शनात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पार्टी शिष्टमंडळाचे सार्वजनिक बांधकाम विभाग अधिकारी यांना निवेदन दिले.
शहरातील सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालय ते तहसील कार्यालय पर्यंत रस्त्याचे काम सुरु आहे. या कामाची वारंवार दूरध्वनी द्वारे तक्रार देण्यात आली. कामाची दि. ११ फेब्रुवारी २५ रोजी बांधकाम विभागातील जेई नेवारे तसेच कामातील कंपनीचे जेई लुतडे हजर असता रस्ता खोदून पाहल्यानंतर त्यामध्ये अनेक कामामध्ये त्रुटी व भ्रष्टाचार आढळून आलेला आहे. त्या कामा मधील कंत्राटदारावर कारवाई करून. त्या कामाची चौकशी करण्यात यावी.असे निवेदन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांच्या मार्गदर्शनात शिष्टमंडळाने बांधकाम विभाग अधिकारी यांना दिले आहे.
यावेळी निवेदन देताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष- शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष बालु वानखेडे, समाजसेवक सुनील डोंगरे, जिल्हा सरचिटणीस दशरथ ठाकरे, अमोल बोरकर, श्रीकांत भगत, सुशील घोडे आदी उपस्थित होते.

