आमदार खासदार गावातील नागरिकांच्या प्रश्नावर शांत असल्याने सरपंच करणार उपोषण.
पल्लवी मेश्राम उपसंपादक नागपूर
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर:- नागपूर जिल्हयाच्या उमरेड तहसिल अंतर्गत पिपरा हे गाव असुन गावात ग्रामपंचायत आहे. गेल्या अनेक वर्षापासुन या गावात विविध समस्यांनी उग्र रुप धारण केले असुन त्याकडे संबंधित प्रशासन लक्ष देण्यास टाळाटाळ करीत असुन याकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी सरपंच प्रशांत वसंतराव पाहुणे लवकरच उपोषण करणार आहे.
पिपरा या गावाची लोकसंख्या 2750 हजाराहून अधिक असुन या गावात अंदाजे 45 वर्षापासुन पाण्याची टाकी आहे. सध्या ती अत्यंत जिर्ण अवस्थेत असुन ती केव्हाही पडू शकते गेल्या 10 वर्षापासुन या टाकीची स्वच्छता झाली नाही. त्यामुळे गावातील लोकांना अशुध्द पाण्याचा पुरवठा होत आहे. नळाला खराब पाणी येत असल्याने आरोग्याला प्रश्न बिकट झाला आहे. या टाकीवर माकडांचा सदैव उच्छाद असल्याने त्यांच्या मलमुत्राचे पाणी नागरीकाना प्यावे लागते. या संदर्भात संबंधितांना निवेदने देऊनही उपयोग झाला नाही. या टाकीचे बांधकाम जिल्हा खनिज निधीतुन करावे यासाठी आपण 19/07/2023 ला जिल्हा खनिकर्म अधिकाऱ्यांना निवेदन दिले होते.
या विधानसभा मतदार संघाचे तत्कालीन आमदार राजू पारवे यांनीही 16/07/2023 रोजी खनिकर्म विभागाला पत्र दिले होते. या गावात नवी 1 लाख लीटर पाणी साठविण्याची क्षमता असणारी पाण्याची टाकी मंजूर करण्यात यावी अशी आपली मागणी आहे. विद्यमान आमदार संजय मेश्राम यांनी सुध्दा खनिकर्म विभागाला या टाकीच्या बांधकामासाठी पत्र दिले. पंरतू त्याला सुध्दा केराची टोपली दाखविण्यात आली.

