अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- कृषी उत्पन्न बाजार समिती कॉटन मार्केट यार्ड, हिंगणघाट येथे श्री संत रविदास महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. संत शिरोमणी रविदास यांनी आपल्या जीवनात सामाजिक समता, बंधुत्व आणि भक्तीचा संदेश दिला. त्यांनी जातिव्यवस्थेचा विरोध करून मानवतेचा संदेश दिला. त्यांच्या रचनांमध्ये ईश्वरभक्ती, मानवतावाद आणि सामाजिक न्याय यांचा समावेश आहे. त्यामुजे कृषी उत्पन्न बाजार समिती कॉटन मार्केट यार्ड, हिंगणघाट येथे श्री संत रविदास महाराज यांच्या जयंती निमित्य त्यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार घालून अभिवादन केले.
याप्रसंगी सभापती अँड सुधिर कोठारी तसेच देवळी बाजार समितीचे सभापती मनोज वसू, अजय बाळसराफ, सचिव टी. सि. चांभारे व संपुर्ण कर्मचारी वृंद उपस्थित होते.

