मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मो नं. 9420751809.
सिरोंचा नगरपंचायत हद्दीत मोठ्या प्रमाणात विकास कामांना सुरवात झाली आहे. नगरपंचायत क्षेत्रात एकूण 17 प्रभाग असून अनेक प्रभागात बांधकाम सुरु आहे.
नाली, सिमेंट काँक्रेट रोड, कलवर्ट असे अनेक बांधकाम जोमात सुरु असून विविध विकास कामांचे भूमिपूजन नगरपंचायत चे उपाध्यक्ष बबलू पाशा यांच्या हस्ते करण्यात आले.
सुरुवातीला सिरोचा नगर पंचायत दर्जा मिडल्या नज़र विकासात्मक प्रमाणात निधी उपलब्ध उपलब्ध होत नव्हती. मात्र न पं उपाध्यक्ष उपक्रमा मुळे तीन वर्षाचा कार्यकाळ संपल्यावर आता विविध प्रभागात अनेक विकास कामे सुरु झाले आहेत पुढेही अनेक विकास कामे होतील, अशी आशा व्यक्त केली जात आहे. नगर पंचायत उपाध्यक्ष बबलू पाशा यांच्या विशेष प्रयत्नाने नागरी क्षेत्रात विकास कामे करण्याअंतर्गत 5 कोटी रुपये निधीस मंजुरी मिळाली आहे. यापुढेही नगर पंचायत हद्दीत मोठ्या प्रमाणात निधी खेचून आणू आणि विकास कामे करु, असे आश्वासन उपाध्यक्ष बबलू पाशा यांनी दिले. यावेळी नगरसेवक सतीश राचर्लावार, नरेश अलोने, रमजान खान, अहमद अली, व्यंकटेश पुजारी, नगरसेविक, प्रतिष्ठित नागरिक, नगरपंचायतचे कर्मचारी उपस्थित होते.

