मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मो. नं. 9420751809.
*कुरखेडा: -* मुळ गाव देऊळगाव येतील व सध्या कुरखेडा येथे वास्तव्यास असणाऱ्या प्रसिद्ध साहित्यिक, सामाजिक कार्यकर्त्या संगीता संतोष ठलाल आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने दरवर्षी गोर,गरीब,दिव्यांग, आदिवासी लोकांपर्यंत , शाळेत, दवाखान्यात व इतर ठिकाणी जाऊन भेट देत असतात आणि आवश्यक असलेले साहित्य दान करत असतात. आजकाल पाळीव पशु प्राण्यांचे महत्व कमी होत आहेत त्यांच्या प्रती आपुलकी कमी दिसत आहे. याच वास्तव परिस्थितीवर आधारित मुक्या पशू प्राण्यांच्या व्यथा, वेदना सांगणारी व समाजप्रबोधन करणारी *आमच्यावर थोडी दया करा* शीर्षक असलेली व दै.नवराष्ट वृतपत्रात प्रकाशित झालेल्या कवितेचा स्वखर्चाने बॅनर बनवून पशुवैद्यकीय तालुका अधिकारी कार्यालयाला कविता दान केली. त्यावेळी समाजप्रबोधन करणाऱ्या या पुण्य कार्यावर पशुवैद्यकीय अधिकारी देवेंद्र मेश्राम, सेवानिवृत्त प्रा.अशोक बोरकर, सेवानिवृत्त शिक्षक शामराव सोनुले यांनी आपले मनोगत व्यक्त करून साहित्यिक, सामाजिक कार्यकर्त्या संगीता ठलाल यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. त्या शुभ प्रसंगी उपस्थित असलेले आदर्श शिक्षिका मिनाताई दवंडे, सुनिता दखणे,रेखा मोहणे, ईश्वर ठाकरे, दै.लोकमतचे ता.पत्रकार सिराज पठाण, अंकूश उईके, पशुवैद्यकीय कार्यालयातील कर्मचारी व लाभार्थी उपस्थित होते. सर्व मान्यवरांनी संगीता ठलाल यांच्या सामाजिक उपक्रमाची प्रशंसा केली व वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या, त्यावेळी संगीता ठलाल यांनी सर्व उपस्थित मान्यवरांचे धन्यवाद मानले.आणि या महान अशा कार्याचे आभार सेवानिवृत्त शिक्षक नरहरी माकडे यांनी मानले.

