मुकेश चौधरी कार्यकारी संपादक
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- शहरातील भारत विद्यालय हे शहरातील नामाकिंत विद्यालय असुन या विद्यालयात 2200 पेक्षा जास्त विद्यार्थी शिक्षण घेतात. उन्हाळयात मुलांना थंड व शुध्द पाणी मिळण्याच्या हेतुनेच स्वर्गिय इंदिरा देशपांडे यांचे स्मृती प्रित्यर्थ हिंगणघाट शहरातील नामंवत बांधकाम व्यवसायक अभियंता रामजी देशपांडे यानी भारत विद्यालय हिंगणघाट ला 80 लिटर क्षमतेचा वाटर कुलर सप्रेम भेट दिला. याप्रसंगी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं वर्धा जिल्हा संघचालक जेठानंद राजपूत, राम देशपांडे, राखी देशपांडे, प्रोग्रेसिव्ह अेज्युकेशन सोसायटीचे सहसचिव संजय देशपांडे, रोटरी क्लबचे सचिव उदय शेन्डे, प्रोग्रेसिव्ह अेज्युकेशन सोसायटीचे सदस्य रमेशराव टपाले, किशोर कोसुरकर, विजय अग्रवाल, प्रमोद हंबर्डे, शरदराव मुरसे, भारत विद्यालयाचे मुख्याध्यापक हरिष भटटड उपमुख्याध्यापक किशोर चवरे , पर्यवेक्षिका निलाक्षी बुरिले आदी उपस्थित होते. याप्रसंगी राम देशपांडे संजय देशपांडे, उदय शेन्डे उपमुख्याध्यापक किशोर चवरे आदीनी मनोगत व्यक्त केले. संचालन मिलिंद सावरकर यानी केले.

