*-समस्या दूर करण्याचे दिले आश्वसन.*
मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मो. नं. 9420751809.
सिरोंचा – नगर पंचायतचे उपाध्यक्ष बबलू पाशा यांनी नपं हद्दीत येणाऱ्या धर्मपुरी वार्डात जाऊन तेथील वार्डातील समस्या जाणून घेतले.
नगर पंचायत हद्दीत येणाऱ्या धर्मपुरी वार्डात विविध समस्या असल्याची माहिती मिळतच नगर पंचायतचे उपध्यक्षा बबलू पाशा यांनी वेळेचा विलंब न करता धर्मपुरी वार्डात जाऊन वार्डातील रस्ते, नाली, विद्युतसह इतर समस्या पाहून तसेच वार्डातील नागरिकांकडून वार्डातील समस्या जाणून घेऊन समस्या लवकरत लवकर दूर करण्याचे सांगितले यावर वार्डातील नागरिक समाधान व्यक्त केले.
यावेळी नपं उपाध्यक्ष बबलू पाशा,स्वीकृत नगरसेवक राजेश बंदेला,नागेश दुग्यालासह धर्मपुरी वार्डातील अनेक नागरिक उपस्थित होते.

