बल्लारपूर ;-दि.14 फेब्रुवारी 2025 ला मध्य रेल्वेचे महाप्रबंधक माननीय धर्मवीर मीना साहेब यांच्या इन्स्पेक्शन दौऱ्यानिमित्त बल्लारपूर शहरात आगमन झाले असता वंचित बहुजन आघाडी बल्लारपूर शहर तथा महिला आघाडीने संयुक्त निवेदन दिले निवेदनात मागणी करण्यात आली की बल्लारशाह रेल्वे स्टेशन हे मोठे जंक्शन आहे परंतु त्यावर असणारा सुविधा अत्यंत तोकड्या आहेत त्यामुळे वंचित बहुजन आघाडी बल्लारपूरने निवेदन देऊन मागणी केली आहे की कोरोना काळापासून बंद असलेल्या दिव्यांग , ज्येष्ठ नागरिक तसेच महिलांच्या संपूर्ण सवलती पूर्ववत कराव्यात सोबतच बंद असलेली सेवाग्राम पॅसेंजर एक्सप्रेस पुन्हा सुरू करावी तसेच नागपूर करिता थेट लोकल गाडी सुरू करावी सोबतच पुणे काजीपेठ हि गाडी आठवड्यातून तीन दिवस करावी व दक्षिण एंडला फ्लॅट क्रमांक 1 वरून 2,3,4,5फ्लॅट क्रमांक वर जाण्याकरिता ओव्हर ब्रीज करावा व प्रतिक्षालय अत्यंत लहान असून ते योग्य आकाराचे मोठे करण्यात यावे आपल्या आगमनाप्रीत्यर्थ राखण्यात आलेली स्वच्छता व सुंदरता निरंतर राहावी अशी व्यवस्था करण्यात यावी अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे शहराध्यक्ष उमेशभाऊ कडू यांच्या नेतृत्वात ,महिला आघाडी अध्यक्षा रेखाताई पागडे ,शहर महासचिव गौतम रामटेके, तालुका महिला आघाडी संघटिका प्रज्ञाताई नमनकर, सुषमाताई उंबरकर ज्येष्ठ मार्गदर्शक कुंजबिहारी बडघरे सर व सल्लागार सुधाकर गेडाम काकाजी ,मनोज रघुवंशी आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते अशी माहिती महासचिव गौतम रामटेके यांनी पत्रकाद्वारे दिली

