अनिल अडकिने नागपूर जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सावनेर १६ फेब्रुवारी:- श्री संत गजानन महाराज देवस्थान सेवा ट्रस्टच्या वतीने सारस्वत धाम न्यू बोरुजवाडा येथे महाराजांच्या मंदिरात दोन दिवसीय महोत्सव सोहळ्याचे आयोजन १९ व २० फेब्रुवारीला करण्यात आलेले आहे.
१९ तारखेला सकाळी ७ ते ९ वा. पर्यंत सामूहिक पारायणाचा कार्यक्रम होईल. सकाळी ११ ते रात्री १२ वा.पर्यंत नियोजित भजन मंडळीचा भजनाचा कार्यक्रम चालेल. २० तारखेला पहाटे ४ ते ६ वा. पर्यंत महाराजांचा अभिषेक होईल. ७ वा. महाराजांची आरती होईल. सकाळी ८.३० वा. श्री.संत गजानन महाराज यांची पालखी मिरवणूक मंदिरातून निघून बोरुजवाडा येथील हनुमान मंदिर वस्तीत भ्रमण करून ती दुपारी १२ वा.पोहोचेल.
दुपारी १ ते ४ वा.पर्यंत राष्ट्रीय कीर्तनकार श्री.डॉ.सचिन महाराज काळे यांचा काल्याच्या कीर्तनाचा कार्यक्रम होईल. नंतर लगेच महाप्रसादाला सुरुवात करण्यात येईल.
या दोन दिवसीय सोहळ्याला जास्तीत जास्त भाविकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन श्री. संत गजानन महाराज ट्रस्ट च्या वतीने मा.श्री.राजूभाऊ कांबे अध्यक्ष,विजयजी ढवळे,प्रवीण रणदिवे, दामोदर मदने, दादाराव मांडवगडे, मनोज निंबाळकर, अँड.भोजराज सोनकुसरे,विजय गायकवाड, ग्रामपंचायत सरपंच प्रवीण झाडे व समस्त गावकरी यांनी केले.

