उषाताई कांबळे सांगली जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सांगली:- बौद्ध धम्म संस्कार संघ श्रावस्ती विहार सांगली यांना दिनांक 16 फेब्रुवारी 2025 रोजी सायंकाळी साडेसात वाजता डॉ. संजीवनी घाटगे मॅडम यांनी एमपीएससी यूपीएससी विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमासाठी आणि आणि त्यांचे पुढील जीवन उज्वल होण्या कामी तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा विचार आचार आणि उच्चार संपूर्ण भारतभर प्रचार आणि प्रसार करण्यासाठी राजपत्रित तसेच आयएएस, आयपीएस अधिकारी निर्माण होण्या कामी पुस्तके सह खजिनदार जगन्नाथ आठवले व सद्या अभ्यास करीत असलेला विध्यार्थी प्रकाश शिवरण यांच्याकडे दान केली त्याबद्दल श्रावस्ती विहार यांच्या वतीने त्यांचे आभार,अभिनंदन आणि शुभेच्छा देण्यात येत आहे. या पूर्वी सुध्दा त्यांनी दोन बाक्स पुस्तके दान केलेली आहेत.
“दानं ददंतु सध्दाय”हे वचन पवित्र बौद्ध धम्म मधील धम्मपद या ग्रंथातून आलेले आहे. धम्मपद हा थेरवाद बौद्ध परंपरेतील एक महत्त्वाचा ग्रंथ आहे. जो भगवान बुद्धाच्या उपदेशाचे संकलन आहे. यात एकूण 423 गाथा असून त्या विविध प्रसंगांमध्ये सांगितल्या गेल्या आहेत. बौद्ध धम्मा मध्ये दान पारमितेस अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. काया आणि मानसिक दान केवळ हे धनाचे नसून ज्ञान दान मदतीचा हात देणे आणि उत्तम विचार पसरविणे हे ही श्रेष्ठ दान आहे. भगवान बुद्धांनी शिकविले की, दान हे केवळ धार्मिक कृती नसून तर ते समाजाच्या आणि वैयक्तिक जीवनाच्या उन्नतीसाठी आवश्यक आहे. श्रद्धेने आणि नि:स्वार्थ पणे दान केल्यास त्याचे पुण्य अधिक मिळत असते. दाना मुळे मन शांत राहते. स्वार्थाचा त्याग होतो. समाजात समानता वाढते. चांगल्या कर्माचे फळ भविष्यात लाभते. त्यामुळे सर्वांनी दान सढळ हाताने नि:स्वार्थपणे करावे, आणि सर्वांनी दान देऊन त्याचा जरूर तो लाभ घ्यावा असे आव्हान सह खजिनदार जगन्नाथ आठवले यांनी सर्वांना केले आहे.

