अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- काश्मीर मधील पुलवामा येथे अतिरेक्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यात शहीद झालेल्या वीर जवानांना प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांच्या मार्गदर्शनात राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी कारंजा चौक येथे पुष्पांजली वाहून श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी समाजसेवक सुनिल डोंगरे यांनी आपले मनोगत व्यक्त करीत पुलवामा येथे अतिरेक्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यात शहीद झालेल्या वीर जवानांना श्रद्धांजली अर्पण केली.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष बालू वानखेडे, समाजसेवक सुनील डोंगरे, जिल्हा सरचिटणीस दशरथ ठाकरे, सैनिक दलचे जिल्हाध्यक्ष पुंडलिक बकाने, विधानसभा बूथ अध्यक्ष अमोल बोरकर, युवक प्रदेश सचिव प्रशांत लोणकर, युवक जिल्हा उपाध्यक्ष सुशील घोडे, रमेशची चतुर, राजू मुडे, शेखर ठाकरे, पंकज भट्ट, मोहम्मद शाहिद, मनीष मुंडे, हुकेश ढोकपांडे, कुणाल गोल्हर, निखिल शेलके, रवि मेसेकर, विपूल वाढई, मंदार अली, रोहित मौर्या, निखिल ठाकरे आदी उपस्थित होते.

