उमेश इंगळे अकोला जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन अकोला:- भारतीय बौद्ध महासभा अकोला जिल्हा (राष्ट्रीय अध्यक्षः डॉ राजरत्न आंबेडकर) या संस्थेच्या सर्व जिल्हा आणी तालुका पदाधिकारी, सभासदांच्या जिल्हाध्यक्ष डॉ. अरुण चक्रनारायण यांचे आदेशावरून आज दि. 13 फेब्रुवारी रोजी भारतीय बौद्ध महासभा अकोला जिल्हा आणी सर्व तालुका कार्यकारण्या बरखास्त करण्यात आल्या.
भारतीय बौद्ध महासभा या संस्थेमध्ये नविन आलेल्या सभासदांना घेण्यासाठी लवकरच नविन जिल्हा कार्यकारणी आणी तालुका कार्यकारण्या गठीत करण्यात येतील त्याबाबतची तारीख आणी स्थळ लवकरच कळविण्यात येईल. याची सर्वानी नोंद घ्यावी. आणी ज्यांना भारतीय बौद्ध महासभेच्या जिल्हा कार्यकारणी मध्ये काम करण्याची इच्छा असेल त्यांनी जिल्हाध्यक्ष डॉ. अरुण चक्रनारायण यांचेशी संपर्क करावा असे आवाहन एम. एम तायडे यांनी केले आहे.

