अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- शहरातील पोलिस ठाण्याच्या हद्दीत हात चालाकीने एटीएम बदली करून एटीएममधून पैसे विड्राल करण्याच्या दोन तक्रार प्राप्त झाल्या होत्या. पोलिसांनी यासंबंधी गुन्हा नोंद करून पोलीस कर्मचारी नरेंद्र डहाके यांनी अनुभवातून घटने संबंधाने फुटेजचे सूक्ष्म निरीक्षण करून गुन्हा उघडकिस आणला. पोलिसांनी आरोपी मयुर अनिल कायरकर वय 33 वर्षे राहणार विश्वकर्मा नगर गल्ली के 4 नागपुर व अभिजीत अनिल गुन्हाणे वय 33 वर्षे राहणार श्रीराम नगर दिघोरी रोड उमरेड रोड नागपुर यांना मोठ्या शिताफिने त्यांचे राहत्या घरून ताब्यात घेवुन सखोल चौकशी केली असता आरोपींनी गुन्हाची कबूल दिली. यावेळी पोलिसांनी आरोपीच्या ताब्यातून नगदीसह 3 लाख 36 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला.
हि कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक अनुराग जैन, अप्पर पोलीस अधीक्षक सागर कवडे, उपविभागीय पोलीस अधिकारी रोशन पंडित, ठाणेदार मनोज गभने यांच्या मार्गदर्शनात
सहाय्यक पोलीस निरीक्षक घनश्याम पाटील, पोलीस उपनिरीक्षक लक्ष्मीकांत दुर्गे, पोलीस उपनिरीक्षक प्रदिप कोल्हे, पोलीस कर्मचारी नरेंद्र डहाके, जगदिश चव्हाण, विशाल बंगाले, आकाश कांबळे, अमोल आडे यांनी केली आहे.
मयुर अनिल कायरकर व अभिजीत अनिल गुन्हाणे या आरोपी कडून हिंगणघाट येथील 02 व जिल्हयातील 03 असे एकूण 5 गुन्हे उघड झाले असून ईतर गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.

