संतोष मेश्राम राजुरा तालुका प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन चंद्रपूर:- शासनाच्या विविध कृषी संलग्न योजनांचा लाभ पात्र शेतकऱ्यापर्यंत जलद गतीने व अधिक प्रभावीपणे पोहोचवण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या वतीने ॲग्रीस्टॅक योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना शेतकरी ओळखपत्र दिल्या जात आहे. याची पाहणी करण्याकरिता चंद्रपूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी विनय गौडा जीसी यांनी मंगळावर दि. १८ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ७.३० वाजता चुनाळा ग्राम पंचायत येथे भेट देऊन योजनेच्या अंमलबजावणीची माहिती घेतली.
याप्रसंगी जिल्हाधिकारी यांनी उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन करतांना, सर्व शेतकऱ्यांनी ओळखपत्र काढून, ओळखपत्र क्रमांक प्राप्त केल्यास शासनाच्या विविध योजनांचा लाभ जलदगतीने घेणे सुलभ होणार असल्याचे प्रतिपादन केले. याप्रसंगी उपविभागीय अधिकारी काश्मीरा संख्ये, तहसीलदार ओमप्रकाश गोंड, माजी आमदार सुदर्शन निमकर यांनी मनोगत व्यक्त केले. चुनाळा ग्रामपंचायतचे सरपंच बाळनाथ वडस्कर यांनी मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. माजी आमदार सुदर्शन निमकर यांच्या हस्ते जिल्हाधिकारी महोदयांनी चुनाळा या स्वगावाला भेट दिल्याबद्दल शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन ग्रामवासीयांच्या वतीने सत्कार केला. जिल्हाधिकारी महोदयांनी वेळेवर सुचना देऊन, दिलेल्या भेटीदरम्यान सुद्धा मोठ्या संख्येने शेतकरी व महिला उपस्थित होत्या.

